सलमान खानच्या वडिलांना पाहताच अमिताभ यांनी असं काही केलं…, नेटक-यांकडून होतंय कौतूक, पाहा व्हिडीओ
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचे 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी सलीम खान यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र अमिताभ यांचे कौतुक केले आहे.

बॉलिवूडचे सुपरस्टार मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्कारावेळी देखील जवळपास अख्ख्या बॉलिवूडने हजेरी लावली होती. मनोज कुमार यांचे पार्थिव आदरपूर्वक अंत्यसंस्कारापूर्वी मनोज कुमार यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील सर्वच सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. यादरम्यान अमिताभ बच्चन आणि सलीम खान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो सोशल माडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.
अमिताभ सलीम खान आहेत हे दिसताच फार घाईने त्या गर्दीतून पुढे आले
या व्हिडीओमध्ये सलमान खानचे वडील सलीम खान देखील मनोज कुमार यांच्या अंतिम संस्कारासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते. मात्र 89 व्या वर्षी सलीम खान यांना चालताना आधाराची गरज भासत होती. ते बॉडिगार्ड यांच्या आधाराने आणि अरबाज खानच्या आधाराने हळू हळू चालताना दिसत आहे. मात्र त्यावेळी त्यावेळी त्यांच्या मागेच अमिताभ बच्चन आणि अभिषेकही येत होते. पण अमिताभ सलीम खान आहेत हे दिसताच फार घाईने त्या गर्दीतून पुढे आले आणि त्यांची भेट घेतली.
अमिताभ यांनी सलीम खान यांना पाहताच मिठी मारली
अमिताभ यांनी सलीम खान यांना पाहताच मिठी मारली, तसेच त्यांचा हात हातात घेत त्यांना आधार दिला. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या बॉडिगार्डला काही सुचनाही दिल्या. अमिताभ बराच वेळ सलीम यांचा हात हातात घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करत असल्याचं पाहायला मिळालं. अमिताभ बच्चन आणि सलीम खान यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांची ही कृती नेटकऱ्यांना खूप भावली आहे. त्यामुळे व्हिडिओला खूप लाईक आणि शेअर केले जात आहे. तसेच अमिताभ यांचे कौतुकही केले जात आहे.
View this post on Instagram
मनोज कुमार यांच्या अंतिम संस्कारासाठी आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात त्यांच्याविषयीचे प्रेम दिसून येत होतं.
दरम्यान ‘भारत कुमार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनोज कुमार यांच्या अंतिम संस्कारासाठी आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात त्यांच्याविषयीचे प्रेम दिसून येत होतं. मनोज कुमार यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी याने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की मनोज कुमार बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांमुळे त्रस्त होते. शेवटच्या क्षणी त्यांना फारसा त्रास झाला नाही आणि त्याने शांततेने जगाचा निरोप घेतला.
मनोज कुमार बऱ्याच काळापासून सिरोसिस या आजाराने ग्रस्त होते.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्यावर शनिवार 5 एप्रिल रोजी अंतिम संस्कार करण्यात आले. मनोज कुमार बऱ्याच काळापासून सिरोसिस या आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर 21 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
‘उपकार’, ‘पूरब-पश्चिम, ‘क्रांती’ आणि ‘रोटी-कपडा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. मनोज कुमार यांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. 1992 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर 2016 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.