Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझ्या या परिस्थितीला कुटुंब जबाबदार”; आमिर खानची लेक असं का म्हणाली?

आमिर खानच्या लेकीवर आयरावर अशी वेळ आली होती की त्यामुळे तिला मोठी किंमत चुकवावी लागली होती. त्या परिस्थितीसाठी कुटुंबच जबाबदार असल्याचेही तिने म्हटले आहे.

माझ्या या परिस्थितीला कुटुंब जबाबदार; आमिर खानची लेक असं का म्हणाली?
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 3:46 PM
Ira Khan On Depression : आमिर खान (Aamir Khan) ची लेक आयरा खान (Ira Khan) ही सोशल मीडियावर बरीच  ॲक्टिव्ह असते. सिनेसृष्टीपासून ती दूर असली तरी सोशल मीडियावरून ती अनेक गोष्टी शेअर करत असते. तिथे तिचे बरेच फॉलोअर्स असून ते तिच्या पोस्ट्सची वाट बघत असतात. आयरा तिच्या फॅन्ससोबत तिच्या पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टीही शेअर करते.
आमिर खान या प्रसिद्ध स्टार असली तरी आयराला त्याची बरीच मोठी किंमत चुकवावी लागली. स्टार्सप्रमाणेच त्यांची मुलही सतत लाईमलाइटमध्ये असतात. त्यांच खासगी असं आयुष्य नसतचं. या प्रसिद्धीचा कळत-नकळतपणे त्यांच्यावरही परिणाम होत असतो. आयरा ही देखील लाइमलाइटमध्ये असते. तिच्या प्रत्येक गोष्टीवर मीडियाचं, चाहत्यांच लक्ष असतंच.
आयराने नुकतंच तिच्या पर्सनल लाइफबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. एवढंच नव्हे तर ती डिप्रेशनमध्येही गेली होती. या मानसिक विकाराशी लढा दिल्यानंतर आता आयरा मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करताना दिसते.
एका मुलाखतीत आयरा डिप्रेशनबद्दल बोलताना दिसली. नैराश्य किंवा डिप्रेशन येण्यामागे कोणतेही एक कारण नसते. ज्या गोष्टींच्या अवतीभवती, ज्या वातावरणा तुम्ही वाढलात त्यातूनच तुमचे व्यक्तिमत्व घडत असते. त्यामुळेच मी ज्या कुटुंबात वाढले, त्याचा माझ्या मानसिक स्थितीवर काहीही परिणाम झाला नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल.
View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

कुटुंबामुळे पडला प्रभाव
आयरा पुढे म्हणाली- माझ्या आयुष्यात जे काही घडले ते खरंच घडलं आहे. हो, माझ्या कुटुंबाचा (मी) भाग असल्यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर 100 टक्के परिणाम झाला आहे. या कुटुंबात जन्म घेतल्याचे अनेक फायदे आहेत, तसेच बरेच तोटेही आहेत.
क्लिनिकल डिप्रेशनचा केला होता सामना
 जेव्हा तिला समजले की ती क्लिनिकल डिप्रेशनची शिकार आहे, त्या काळाबद्दलही आयरा या मुलाखतीत बोलली. त्यावेळी माझ्याकडे उपचारासाठी आर्थिक स्रोत अर्थात पैसा होता आणि माझी काळजी घेणारे लोकही माझ्या आसपास होते. नैराश्य आणि भीतीने मी अपंग झाले होते. त्यामुळे तिने अशा तऱ्हेच्या समस्यांचा , भीतीचा सामना करणाऱ्या इतर लोकांना मदत करण्यासाठी 2021 मध्ये अगस्तू फाउंडेशनची निर्मिती केली.
पण दीड वर्षापर्यंत मी या फाऊंडेशनसाठी काही (काम) केले नाही. कारण जुलै 2022 पर्यंत मी डिप्रेशनमध्ये होते. क्लिनीकल डिप्रेशनमध्ये असताना मी काही महिन्यांनी एखाद्या खोल डोहात बुडून जायचे. ती स्थिती आठवडे- दोन आठवडे असायची. त्यानंतर मी काही (काम) केलं तर मला (डिप्रेशनमधून) बाहेर पडण्यास मदत मिळायची, असा अनुभव आयराने सांगितला.
आयरा ही तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. आयरा ही आमिर व त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी असून तिला जुनैद हा छोटा भाऊही आहे.
काही महिन्यांपूर्वीच तिचा नुपूर शिखरे याच्यासोबत साखरपुडा झाला. त्या समारंभाचे फोटोही बरेच व्हायरल झाले होते.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.