100 कोटी कमावणाऱ्या ‘गझनी’त काम करण्यात आमिरला नव्हता इंटरेस्ट, या अभिनेत्याच्या नावाची केली होती शिफारस

गझनी चित्रपटात आमिरला काम करायचे नव्हते, त्याने या चित्रपटासाठी वेगळ्याच अभिनेत्याचे नाव सुचवले होते.

100 कोटी कमावणाऱ्या 'गझनी'त काम करण्यात आमिरला नव्हता इंटरेस्ट, या अभिनेत्याच्या नावाची केली होती शिफारस
आमिरला गझनीत काम करायचे नव्हते.Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 9:56 AM

मुंबई : मि, पर्फेक्शनिस्ट या नावाने ओळखला जाणारा आणि सगळं काम उत्तम करण्याचा ध्यास असणारा आमिर खान (Aamir Khan)आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तो नेहमीच थोडे वेगळे काम, चित्रपट करण्याच्या प्रयत्नात असतो. त्याचा ‘गझनी’ हा चित्रपटही असाच होतो, त्यासाठी त्याने खास बॉडीही कमावली होती. 2008 साली आलेला ‘गझनी(Ghajini) हा चित्रपट तूफान चालला होता. तेव्हा तो देशांतर्गत बाजारात 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आणि अशा प्रकारे, भारतातील रु. 100 कोटी क्लबची संकल्पना सुरू झाली. पण हाच ब्लॉकबास्टर ठरलेला चित्रपट करण्यात आमिरला जराही रस नव्हता, हे तुम्हाला माहीत आहे का ?

या चित्रपटाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादास यांनीच हा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हा किस्सा सांगितला. ‘ आमिर खानला सुरुवातीला हा चित्रपट करायचा नव्हता. एवढंच नव्हे तर त्याच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याचेही नाव सुचवले होते. तो अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नव्हे तर सलमान खान होता,’ असे त्यांनी सांगितले. गझनी या चित्रपटात आमिरसोबत असिनने (Asin) प्रमुख भूमिका केली होती. तसेच त्यात जिया खाननेही काम केले होते.

हो, हे खरं आहे. या चित्रपटासाठी सलमान खानचे नाव सुचवलं खरं, पण दिग्दर्शकाला गझनीमध्ये फक्त आमिरलाच घ्यायचे होते. मुरुगादास यांनी खुलासा केला की मूळ तमिळ चित्रपट आमिरने पाहिला आणि त्याच्या टीमशी संपर्क साधला. गजनी फक्त सलमानच करू शकतो, असा सल्लाही आमिर खानने दिला.

हे सुद्धा वाचा

खरंतर या चित्रपटाचे शीर्षक असलेली अर्थात गझनी ही भूमिका नायक संजय सिंघानियाने नव्हे तर प्रदीप रावत यांनी साकारलेली खलनायकाची आहे. मुलाखतीत मुरुगदास नायक संजयच्या भूमिकेबद्दल बोलत होते.

सलमानकडे सॉलिड बॉडी

त्यानंतर मुरुगादास पुढे म्हणाले की, “मग मी त्याला (आमिरला) पटवून दिलं की, सलमानकडे माचो बॉडी आहे, तो टॅटू काढू शकतो, तो लढू शकतो. त्यावेळी आमिर काही मृदू स्वभावाचे चित्रपट करत होता. मी त्याला पटवून दिले, ‘सर, जर सलमानने हा चित्रपट केला तर मग हा आणखी एक ॲक्शन चित्रपट ठरेल पण जर तुम्ही हा चित्रपट केला तर ते प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठरेल. त्यानंतर आमिर चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाला ‘ असेही मुरुगादास यांनी नमूद केले.

आसिन गझनीतून केले हिंदीत पदार्पण

गजनी चित्रपटातून असिनने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट क्रिस्टोफर नोलनच्या मेमेंटोवर आधारित होते, ज्यामध्ये नायकाला शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा त्रास असतो. दरम्यान गजनीला प्रचंड यश मिळूनही, ए.आर. मुरुगदासने हिंदी भाषेतील फक्त दोनच चित्रपट बनवले आहेत. अक्षय कुमार स्टारर हॉलिडे आणि सोनाक्षी सिन्हाचा अकिरा, हे ते चित्रपट आहेत. मुरुगदास यांनी अलीकडेच ’16 ऑगस्ट 1947′ रोजी ही त्यांची नवीन तामिळ निर्मिती प्रदर्शित केली.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...