नववर्ष सुरू होण्याआधी आमिर खानच्या आधीच्या बायकोने घेतला मोठा निर्णय; थेट…
प्रख्यात दिग्दर्शिका किरण राव ही सध्या तिच्या 'लापता लेडीज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या बहुचर्चित चित्रपटाची भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत एंट्री पाठवण्यात आली आहे. त्यातच आता नव वर्ष सुरू होण्याआधी किरण रावने एक मोठा निर्णय घेतलाय.
मि. पर्फेक्शनिस्ट आमिर खान याची माजी पत्नी, प्रख्यात दिग्दर्शिका किरण राव ही सध्या तिच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या बहुचर्चित चित्रपटाची भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत एंट्री पाठवण्यात आली आहे. त्यातच आता नव वर्ष सुरू होण्याआधी किरण रावने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने तिचं एक घर रेंटने दिलं आहे. या घरात राहण्यासाठी किरण राव तगडं भाडं आकारते. तो आकडा ऐकून तुम्हीदेखील थक्क व्हाल.
किती आहे घराचं भाडं ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किरण रावचा हा फ्लॅट बांद्रा येथील पाली हिल या पॉश भागात आहे. डॉक्युमेंट्सनुसार, या आलिशान फ्लॅटमध्ये राहण्यासाठी भाडकेरूंना किरण राव हिला दर महिन्याला 6.5 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. दुसऱ्या वर्षी ही रक्कम वाढून 6.82 लाख तर तिसऱ्या वर्षी दर महिन्याला हे भाडं वाढून 7.16 लाख इतकं होईल. तर चौथ्या वर्षी ही र्कम 7.52 लाख आणि पाचव्या वर्षी या घरात राहण्यासाठी दर महिन्याला 7.09 लाख रुपये मोजावे लागतील.
अकादमी पुरस्कारांमध्ये ‘लापता लेडीज’चा समावेश
97 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव हिने केले आहे. तसेच तिच्या माजी पतीसह, आमिर खान याच्यासह त्याची एरत्र निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा दोन गावातील मुलींभोवती फिरते, लग्नानंतर ज्यांचे पती बदलतात. नितांशी गोयल आणि प्रतिभा यांनी यात मुख्य भूमिका साकारली आहे. फूल आणि जया यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या. तसेच स्पर्श श्रीवास्तव, रवि किशन आणि छाया कदम हेही प्रमुख भूमिकेत आहेत.
या स्टार्सनीही भाड्याने दिलं घर
किरण राव व्यतिरिक्त या वर्षात अनेक बॉलीवूड स्टार्सनी त्यांचे फ्लॅट्स मोठ्या प्रमाणात भाड्याने दिले आहेत. ज्यामध्ये शाहिद कपूर आणि अजय देवगणच्या नावाचा समावेश आहे. त्याचबरोबर सलमान खानने दुकान भाड्याने दिले आहे. किरण राव आणि आमिर खान यांचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या 16 वर्षानंतर दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. मात्र, घटस्फोटानंतरही दोघेही चांगले मित्र आहेत. 2005 मध्ये त्यांचे लग्न झालं होतं.