Anant Ambani and Radhika Merchant : अंबानींच्या सोहळ्यात आमिर-सलमान-शाहरूखचा धमाकेदार डान्स, तुम्ही व्हिडीओ पाहिला का ?
शाहरुख, सलमान आणि आमिर खान , बॉलिवूडचे हे तीनही स्टार एकाच मंचावर येणं हे चित्र तसं विरळाच, पण अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यात अनेकांची ही इच्छादेखील पूर्ण झाली. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील जामनगरमधील सोहळ्यात बॉलिवूडचे सितारे एकत्र आले असून त्यामध्ये संगीत नाईटदरम्यान तीनही खान्सनी एकत्र परफॉर्म केलं. त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने उपस्थितांचे हृदय जिंकलं.
Anant Ambani and Radhika Merchant pre wedding : गुजरातमधील जामनगर मध्ये सध्या दिवसाही ‘तारे’ दिसत आहेत. अहो का काय विचारता, निम्म बॉलिवूड तिथे एकटवटलं आहे. मुकेश व नीता अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवीश पॉपस्टार रिहानाच्या परफॉर्मन्सवर सगळे थिरकले, तर 2 मार्चच्या सायंकाळी अख्खं बॉलिवूड थिरकलं. बॉलिवूडच्या अनेक कलकारा्ंनी या दिवशी खास परफॉर्मन्स दिला, पण सर्वात लक्षवेधी ठरला तो तिनही खान्सचा डान्स… शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान , बॉलिवूडचे हेतीनही स्टार एकाच मंचावर येणं हे चित्र तसं विरळाच, पण अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यात अनेकांची ही इच्छादेखील पूर्ण झाली.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये आमिर, सलमान आणि शाहरुखने एकत्र डान्स केला. त्यांचा एकत्र परफॉर्मन्स हा छप्परतोड होता. तिघांनीही आधी एकमेकांच्या गाण्यांवर, त्यांच्या स्पेशल स्टेप्स करत डान्स केला आणि नंतर तिघेही नाचो नाचोवरही थिरकले. सोशल मीडियावर त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होते आहे. आधी सलमान खानने त्याची टॉवेलवाली स्टेप, नंतर आमिरने रंग दे बसंती मधील पाठशालाची स्टेप केली. त्यानंतर शाहरूख खानने त्याची हुक स्टेप केली. शेवटी आमिर, सलमान आणि शाहुख तिघेही ‘नाचो नाचो’ गाण्यावर हुकस्टेप करताना दिसले. त्यांचा हा परफॉर्मन्स ऐतिहासिक होता. पहिल्यांदाच तिघेही एकत्र डान्स करताना दिसले. याशिवाय शाहरुख खाननेही एकट्याने डान्स केला. पठाण चित्रपटातील झूमे जो पठान या गाण्यावर तो डान्स करताना दिसला होता. सलमान खानने त्याच्या लोकप्रिय गाण्यांवर एक वेगळा डान्स परफॉर्मन्सही दिला.
View this post on Instagram
दिलजीत दोसांझचा किलर परफॉर्मन्स
या म्युझिकल नाईटमध्ये दिलजीत दोसांझही त्याच्या चार्टबस्टर गाण्यांवर परफॉर्म करताना दिसला. शाहरुख खान, सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि नव्या नवेली नंदा हे देखील दिलजीतसोबत डान्समध्ये सामील झाले होते. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खानही डान्स करताना दिसले. ते दोघे मंचावर दिलजीतसोबत सामील झाले. सर्व सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाचा खूप आनंद लुटला. सायना नेहवालही दिलजीतच्या गाण्यांवर डान्स करताना दिसली.
View this post on Instagram
यंग जनरेशचाही धमाकेदार डान्स
बॉलिवूडच्या तरुण पिढीनेही आपले नृत्यकौशल्य दाखवले. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान यांनी एकत्र डान्स केला. ते लेजा-लेजा गाण्यावर परफॉर्म करताना दिसला.
View this post on Instagram