Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रिय नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, अभिजीत बिचुकलेचं पंतप्रधान मोदींना पत्र

बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukales letter to PM Modi) काही ना काही कारणांनी चर्चेत असतो.

प्रिय नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, अभिजीत बिचुकलेचं पंतप्रधान मोदींना पत्र
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 11:37 AM

सातारा : बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukales letter to PM Modi) काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. अभिजीत बिचुकलेने यापूर्वी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्यांना सल्ला दिला आहे. अभिजीत बिचुकलेच्या नावाचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. (Abhijit Bichukales letter to PM Modi)

कोरोनामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याबाबतचे आदेश द्या, असं या पत्रात अभिजीत बिचुकलेने म्हटलं आहे. कोरोनाने जगभरात कहर माजवला आहे. 15 वर्षाखालील मुले ही भारताचं भविष्य आहे. या वयात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही किंवा कोरोनाची साखळी तुटत नाही, तोपर्यंत यंदाच्या वर्षी सर्व शाळा-कॉलेज बंद करा, असं बिचुकलेने म्हटलं आहे.

वाचा : ना कोटी, ना लाख, अभिजीत बिचुकलेंची संपत्ती किती?

तसंही अनेक राज्यात इयत्ता नववी पर्यंत श्रेणी पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे मुलांना शाळेत बोलवण्यापेक्षा वर्षभर शाळा बंद ठेवा. अन्यथा शाळा सुरु झाल्या तर खेळण्या-बागडण्याच्या नादात मुलं सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाहीतच. त्यामुळे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढेल, असंही बिचुकलेने म्हटलं आहे.

(Abhijit Bichukales letter to PM Modi)

सत्तास्थापनेचा दावा

यापूर्वी अभिजीत बिचुकलेंनी महाराष्ट्राच्या सत्तानाट्यावेळी, राज्यपालांना पत्र लिहून सत्ता स्थापन्याची संधी देण्याची मागणी केली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल भंगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले होते. पण भाजप-शिवसेनेत वादामुळे अभिजित बिचुकले यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे पत्राद्वारे दावा केला होता. त्यावेळी बिचुकले (Abhijeet bichukale letter to governor) यांच्या पत्राची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होती.

“गेले 20 वर्ष मी समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे. सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या विरुद्ध मी संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार चार वेळा निवडणूक लढली आहे. राष्ट्रपतीपदासाठीही मी प्रयत्न केले होते. नुकतेच मी वरळी विधानसभा मतदारसंघातुनही विधानसभा निवडणूक लढवली आहे, असं बिचुकले यांनी आपल्या पत्रात नमूद केलं होतं.

संबंधित बातम्या 

अभिजीत बिचुकलेंचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा  

अभिजीत बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त, 500 मतं मिळतानाही नाकी नऊ

ना कोटी, ना लाख, अभिजीत बिचुकलेंची संपत्ती किती?

औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप.
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं.
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली.
बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल
बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल.
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'.
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?.
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा.
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल.
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी.
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक.