मोठी बातमी ! KBC 16मध्ये ऐश्वर्या आणि आराध्याचं नाव घेण्यास अमिताभ यांची टाळाटाळ; घटस्फोटाच्या…

अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या नातेसंबंधाबाबतच्या अफवांनी जोर धरला आहे. केबीसी 16मध्ये अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या आणि आराध्याचे नाव घेण्यास टाळाटाळ केल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे. निम्रत कौरसोबत अभिषेकचे अफेयर आणि बच्चन कुटुंबातील मतभेद यामुळेही ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, बच्चन कुटुंबाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मोठी बातमी ! KBC 16मध्ये ऐश्वर्या आणि आराध्याचं नाव घेण्यास अमिताभ यांची टाळाटाळ; घटस्फोटाच्या...
ऐश्वर्या आणि आराध्याचं नाव घेण्यास अमिताभ यांची टाळाटाळImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 12:53 PM

अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या संसाराबाबतच्या सतत चर्चा सुरू आहेत. दोघांमध्ये जमत नसून प्रकरण घटस्फोटापर्यंत गेल्याची चर्चा आहे. बच्चन कुटुंबाकडून या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सेलिब्रिटींबाबत अशा अफवा नेहमी उठत असतात. त्यामुळेही बच्चन कुटुंबाला यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नसावी. पण बच्चन कुटुंबात काही गोष्टी अशा घडत आहेत की त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्यात सर्व काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. केबीसी16च्या एका भागात तर अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांचं नाव घेण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे.

सोशल मीडियावर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या चर्चा सुरू आहेत. त्यात बच्चन कुटुंब काहीच बोलत नसल्याने या चर्चांना खतपाणी मिळताना दिसत आहे. ‘दसवी फेम’ अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत अभिषेकचं अफेयर सुरू असल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात तणाव आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांच्या स्वभावामुळेही ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात अडचणी आल्याचं काही लोक सांगत आहे. प्रत्येक जण आपआपली थिअरी मांडताना दिसत आहे.

सुनेचं नाव घेण्यास टाळाटाळ

हे सुद्धा वाचा

महायनायक अमिताभ बच्चन हे केबीसी 16च्या एका भागात स्पर्धकासोबत होते. त्यावेळी अमिताभ यांच्या चाहत्यांनी काही गोष्टी नोटीस केल्या. केबीसीच्या एका एपिसोडमध्ये ‘बंटी और बबली’ या सिनेमातील ‘कजरा रे कजरा रे’ या गाण्याशी संबंधित एक सवाल विचारण्यात आला. यावेळी अमिताभ यांनी या गाण्याची माहिती देताना अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीचं नाव घेतलं. पण ऐश्वर्याचं नाव घेतलं नाही. विशेष म्हणजे ऐश्वर्यावरच हे गाणं चित्रित झालं होतं. ती या गाण्याची मुख्य भाग होती. तरीही अमिताभ यांनी ऐश्वर्याचा उल्लेख टाळल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटलं.

आराध्याचं नावही नाही

याच प्रकारे आणखी एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी नातवंडांचा उल्लेख केला. त्यांनी नव्या आणि अगस्त्यचं नाव घेतलं. पण आराध्याचं नाव घेतलं नाही. केबीसीच्या वेगवेगळ्या भागात अमिताभ यांनी ऐश्वर्या आणि आराध्याचं नाव घेतलं नाही. सून आणि नातीच्या नावाचा उल्लेख करणं टाळलं. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे मार्ग वेगळे झालेत का? अशी चर्चा जोर धरत आहे. मात्र, बच्चन कुटुंबीयांनी या मुद्द्यावर काहीच भाष्य केलंलं नाही. त्यामुळे बच्चन कुटुंबात चाललंय काय? असा सवाल चाहत्यांना पडला आहे.

Non Stop LIVE Update
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'
दादांचं निवडणुकीच्या तोंडावर मोठं वक्तव्य, 'यावेळी उभंच राहत नव्हतो..'.
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट
सदा सरवणकर माहिममधून उमेदवारी अर्ज मागे घेणार? शिंदेंकडून अल्टिमेमट.
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल
'ईदचं लायटिंग,हिरवे कंदिल लागले असते, तर...', मनसेचा उबाठाला थेट सवाल.
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
महायुतीचं सरकार येणार अन् मोठं पद मिळणार, अजितदादा नेमकं काय म्हणाले?.
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर
माल संबोधल्याने एनसी यांचा राग अनावर, उबाठाच्या खासदाराला धरलं धारेवर.
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार
'कोणाचा दबाव?', राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं तर फडणवीसांनी मानले आभार.
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे
दिवाळीत राजकीय 'फटाके', 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? नेत्यांचे दावे.
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं
जरांगेंच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं.
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....