Aishwarya Rai – Abhishek Bachchan : ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मोठी अपडेट, दोघं पुन्हा एकत्र येणार ?

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल उलटसुलट चर्चा बऱ्याच महिन्यांपासून ऐकायला येत आहे. ते दोघं घटस्फोट घेणार असल्याची अफवाही काही काळापासून उडत आहे. याचदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे त्यांच्या दोघांच्याही चाहत्यांच्या चेहऱ्यावर एक हसू फुलेल. नक्की काय आहे प्रकरण ? जाणून घेऊया.

Aishwarya Rai - Abhishek Bachchan : ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मोठी अपडेट, दोघं पुन्हा एकत्र येणार ?
अभिषेक -ऐश्वर्या पुन्हा येणार एकत्र ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 2:15 PM

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांच्यातील मतभेदाच्या बातम्या समोर येत आहेत. दोघं घटस्फोट घेणार आहेत, इथपर्यंत ही स्थिती पोहोचल्याची देखील चर्चा आहे. मात्र त्या बातम्यांवर दोघांपैकी कोणीही अद्याप मौन सोडलेलं नाहीये. मात्र अंबानींच्या लग्नसोहळ्यात झालेली वेगळी एंट्री, केबीसमध्ये बिग बींच्या वाढदिवसानिमित्त दाखवण्यात आलेल्या व्हिडीओत ऐश्वर्याच्या शुभेच्छा नसणं आणि गेल्या आठवड्याच ऐश्वर्याचा वाढदिवसझाल्यावर बच्चन कुटुंबापैकी कोणीच किंवा खुद्द पती अभिषेकनेही तिला शुभेच्छा न देणं हे अनेकांना खटकलंय. बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या यांच्यात जो दुरावा आला आहे, त्याबद्दल लोकांच्या , नेटीझन्सच्या मनात अनेक सवाल आहेत.

पण, घटस्फोटाच्या अफवांदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. जी ऐकून त्या दोघांच्याही चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. हे वाचून आश्चर्य वाटलं ना ? चला जाणून घेऊया, खरं काय ते…

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात घटस्फोटाच्या अफवा समोर येत आहेत, पण चाहत्यांना दोघांना नेहमी एकत्र पाहायचे आहे. ते दोघे इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. पती-पत्नीमधील ‘ती’च्या एंट्रीने नात्यात दुरावा वाढल्याचेही अलीकडे बोलले जात होते, मात्र दोघांनीही या अफवांवर मौन पाळले. आता पुन्हा एकदा त्यांचे पुनर्मिलन होणार असल्याच्या बातम्या येत आहेत, त्यामुळे चाहते खूप खूश आहेत.

हे सुद्धा वाचा

मणिरत्नम आणणार अभी-ऐश्वर्याला एकत्र

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन लवकरच एका चित्रपटासाठी पुन्हा हातमिळवणी करणार आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम आपल्या ‘गुरु’ चित्रपटातील या जोडीला, अर्थात अभिषेक आणि ऐश्वर्या यांना सोबत आणखी एका हिंदी चित्रपटाची योजना आखत आहेत, असे वृत्त आहे.  मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

तिसऱ्यांदा हिट ठरणार जोडी ?

त्यांच्या नात्याबद्दलच्या सध्या चित्रविचित्र चर्चा सुरू आहेत. मात्र त्याच दरम्यान मणिरत्नम यांच्या एका जवळच्या सूत्राने काही बातम्या शेअर केल्या आहेत. टाइम्सनाउ.कॉम मधील वृत्तानुसार, या तिसऱ्या चित्रपटासाठी ऐश्वर्या अभिषेकला पुन्हा एकत्र आणण्यासाठी मणिरत्नम यांना एक चांगली कथा सापडली आहे.

मणिरत्नम यांनी अभिषेकचं केलं होतं कौतुक

जर हा चित्रपट बनला तर मणिरत्नम यांच्यासोबत अभिषेकचा हाँ चौथा चित्रपट असेल. त्या दोघांचं नात स्पेशल आहे त्याबद्दल एकदा अभिषेकच खुलून बोलला होता. ‘जेव्हा ते पहिल्यांदा ‘युवा’साठी मला साइन करायला आमच्या घरी आले, तेव्हा मला वाटलं की ते पा (वडील अमिताभ बच्चन) यांना साइन करायला आले आहेत. पण ते माझ्यासाठी आलेत कळल्यावर मला खूप आनंद झाला. मणि यांच्यासोबत काम करण्यास कोणताही अभिनेता तयार असतो. त्यांना मी आतापर्यंत तीनदा त्यांच्या सिनेमासाठी योग्य वाटलोय याचा मला खूप आनंद आहे ‘ अशी प्रतिक्रिया अभिषेके दिली होती.

2014 मध्ये अभिषेकने मारला होता टोमणा

अलीकडे, वैवाहिक जीवनात अडचणी आल्या तरीही अबिषेकने मौन बाळगले आहे. यापूर्वीही त्याने याचा सामना केला आहे. 2014 मध्येही असेच दावे समोर आले होते, परंतु अभिषेकने ते फेटाळून लावले आणि X वर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने लिहिल होतं – ‘ठीक आहे. मला विश्वास आहे की मी घटस्फोट घेत आहे. मला कळवल्याबद्दल धन्यवाद! माझे पुन्हा लग्न केव्हा होईल तेही (कोणी) सांगेल का?’ असा उपहासात्मक ट्विट त्याने केलं होतं

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.