“मी करू शकत नाही”, फ्लॉप चित्रपटांना कंटाळून बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतलेल्या अभिषेकला बीगबींनी सावरलं
फ्लॉप चित्रपटांना कंटाळून बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतलेल्या अभिषेकला वडिलांनी म्हणजेच बीगबींनी सावरलं.त्यांनी वडील म्हणून नाही तर इंडस्ट्रीतला एक जेष्ठ अभिनेता म्हणून पाठिंबा देत प्रोत्साहन दिल्याचही अभिषेकनं म्हटलं
अभिषेक बच्चनचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘आय वॉन्ट टू टॉक’ पूर्णत: फ्लॉप ठरला. चित्रपटाला बॉक्सऑफिसवर 2 कोटीही कमावता आले नाही. पण अभिषेकचे चित्रपट फ्लॉप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याधीही एक काळ असा होता की अभिषेकच्या जवळजवळ सर्वच चित्रपट हे फ्लॉपच्याच यादीत येत होते. याच गोष्टीला कंटाळून अभिषेकने ही फिल्मइंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता.
अभिषेकनं नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या अभिनयाच्या क्षमतेवर शंका घेत इंडस्ट्री सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर खुलासा केला. मुलाखतीदरम्यान अभिषेकनं त्याच्या अभिनयक्षेत्रातील आव्हानांविषयी सांगितलं. करिरच्या सुरुवातीलाच त्याचे अनेक चित्रपट फलॉप ठरत होते, या सगळ्याचा परिणाम त्याच्यावर होत होता असं अभिषेकनं सांगितलं. बॉक्स आफिसवर काही चित्रपट कामगिरी करू न शकल्यानं अभिनय क्षमतेबद्दलची शंका त्याच्या मानत निर्माण झाल्याचेही त्याने सांगितले.
अभिषेकने म्हटलं की,”मी काहीही केलं तरी ते काम चालत नव्हतं. शेवटी मी माझ्या वडिलांना सांगितलं मी सर्व प्रकारचे सिनेमे, शैली करून पाहिली. आता मी हे करू शकत नाही” असं म्हणत त्याने हे क्षेत्रच सोडण्याचा निर्णय घेतल्याचे अभिषेकनं बीगबींना सांगितलं होतं. पण त्यावळी अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचा आत्मविश्वास वाढवत केवळ वडील म्हणून नाही तर इंडस्ट्रीतला एक जेष्ठ अभिनेता म्हणून पाठिंबा देत प्रोत्साहन दिल्याचही अभिषेकनं म्हटलं.
अभिषेकचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं की,”मी हे तुला तुझे वडील म्हणून नाही तर तुझा ज्येष्ठ म्हणून सांगत आहे. तू तयार कलाकृतीच्या जवळपासही नाहीस. तुला खूप सुधारणा करायच्या आहेत. पण तुझ्या प्रत्येक चित्रपटात मला सुधारणा दिसून येत आहे. यात काही ना काही दडलेले आहे. तुम्ही किती चांगले व्हाल हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्हाला किती मेहनत करायची आहे,यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही काम करत रहाणं.’ अंस सांगत त्यांनी अभिषेकला हे क्षेत्र न सोडण्याचा आणि पुढे काम करत राहण्याचा सल्ला दिला.
अभिषेक बच्चनने हा सल्ला लक्षात घेत कोणत्याही भूमिकेला सामोरे जाण्यावर तो आता लक्ष देतो. मग ती सहाय्यक, दुय्यम किंवा लहान का असेना.तो आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आजही तो प्रयत्न करत असल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे पुढे भविष्यात अभिषेक हाच सल्ला आणि वडिलांचे मार्गदर्शन लक्षात घेऊन या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मेहनत करत राहिलं अस दिसून येत आहे.