Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचं करिअर अभिषेक बच्चनमुळे उद्ध्वस्त? गमावले अनेक मोठे चित्रपट, ‘ त्या’ पोस्टमुळे माजली खळबळ

Abhishek Bachchan & Aishwarya Rai: सध्या बच्चन कुटुंब वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे, ते म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील बेबनाव. गेल्या काही काळापासून त्या दोघांमधील वादाच्या चर्चा फिरत असून ते विभक्त होणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. बराच काळ दोघांसह बच्चन कुटुंबानेदेखील या विषयावर मौन राखले होते

Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचं करिअर अभिषेक बच्चनमुळे उद्ध्वस्त? गमावले अनेक मोठे चित्रपट, ' त्या'  पोस्टमुळे माजली खळबळ
ऐश्वर्या रायचं करिअर अभिषेकमुळे उद्ध्वस्त ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 11:14 AM

बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील नामवंत कुटुंबापैकी एक आहे. अमिताभ, जया, अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन तसेच नुकताच बॉलिवूडमध्ये आलेला अगस्त्य नंदा, अशी कलाकांराची फौजच गेल्या अनेक काळापासून बॉलिवूड गाजवतंय. मात्र सध्या बच्चन कुटुंब वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे, ते म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील बेबनाव. गेल्या काही काळापासून त्या दोघांमधील वादाच्या चर्चा फिरत असून ते विभक्त होणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. बराच काळ दोघांसह बच्चन कुटुंबानेदेखील या विषयावर मौन राखले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन याने या विषयावरची चुप्पी तोडली असून आपण अद्यापही विवाहीत असल्याचे स्पष्ट केले होते.

एकीकडे अभिषेकने घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला. पण ऐश्वर्याने आत्तापर्यंत यावर मौन का पाळले आहे, असा सवाल काही चाहत्यांच्या मनात आहे. याचदरम्यान, आणखी एक पोस्ट व्हायरल होत असून अभिषेकने त्याची पत्नी ऐश्वर्या रायचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे.

अभिषेकमुळे ऐश्वर्याचे करिअर बरबाद ?

हे सुद्धा वाचा

Reddit (रेडीट) वरची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामुळे चाहते मात्र हैराण झाले आहेत. या पोस्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की , ‘ शाहरुख खानच्या हॅपी न्यू ईअर या सिनेमात दीपिका पडूकोण झळकली, पण आधी ती भूमिका ऐश्वर्या राय हिला ऑफर करण्यात आला होता. मात्र अभिषेक बच्चन खूप असुरक्षित होता आणि ऐश्वर्याने शाहरूखसोबत काम करू नये अशी त्याची इच्छा होती.’

अनेक मोठ्या ऑफर्स हिसकावून घेतल्या ?

एवढंच नव्हे तर दोस्ताना हा गाजलेला चित्रपट देखील प्रियांका चोप्राच्या आधी ऐश्वर्याला ऑफर झाला होता. मात्र अभिषेकने तिला या चित्रपटातही काम करू दिलं नाही. कारण ती जी भूमिका साकरणार होती, ती (चित्रपटात)दुसऱ्या कलाकारासोबत निघून गेली असती, आणि अभिषेकला ते मान्य नव्हतं. ऐश्वर्याला अनेक मोठ्या चित्रपटाच्या ऑफर्स आल्या, पण तिने काही ना काही कारण देऊन ते चित्रपट करण्यास नकार दिला, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला. दरम्यान, या व्हायरल दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

अंबानींच्या लग्नातही बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही ऐश्वर्या

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका यांचा विवाह गेल्या महिन्यात पार पडला. त्यासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. बच्चन कुटुंबियांनीही या लग्नाला हजेरी लावली, अभिषेक त्यांच्यासोबत होता पण ऐश्वर्या राय आणि आराध्या यावेळी तिथे नव्हत्या. त्या दोघींनी नंतर वेगळी एंट्री केली. त्यामुळे अभिषेकला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं होतं. दोघांमध्येही सर्व काही आलेबल नसल्याच्या चर्चांना आणखीनच हवा मिळाली.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.