Abhishek Bachchan and Karisma Kapoor : त्या ‘ॲग्रीमेंट’मुळे अभिषेक-करिश्माचा साखरपुडा तुटला ? अमिताभ बच्चन ठरले कारणीभूत ?
बॉलिवूडमधील बच्चन कुटुंबातील ऑलमोस्ट सगळेच सदस्य चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा हे सगळेच हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहेत. बच्चन कुटुंबाबद्दल काही ना काही जाणून घेण्यास लोक नेहमीच उत्सुक असतात. सध्या अभिषेक बच्चन चित्रपटांत कमी दिसत असला तरी तो त्याच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतो
बॉलिवूडमधील बच्चन कुटुंबातील ऑलमोस्ट सगळेच सदस्य चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी अभिनेत्री जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा हे सगळेच हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आहेत. बच्चन कुटुंबाबद्दल काही ना काही जाणून घेण्यास लोक नेहमीच उत्सुक असतात. सध्या अभिषेक बच्चन चित्रपटांत कमी दिसत असला तरी तो त्याच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतो. ऐश्वर्या राय आणि त्याच्या लग्नाला नुकतीच 17वर्ष पूर्ण झाली. 20 एप्रिल 2007 साली त्यांचं लग्न झालं. पण ऐश्वर्याशी लग्न होण्यापूर्वी अभिषेकचा आधी एका अभिनेत्रीशी साखरपुडा झाला होता. ती अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांच होणार लग्न मोडलं आणि ते वेगळे झाले.
करिश्मा अभिषेकचा साखरपुडा
करिश्मा कपूर बच्चन कुटुंबाची सून बनेल अशी अनेक लोकांची अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही. कारण अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा तुटला. खरंतर अमिताभ बच्चन यांच्या 60व्या वाढदिवसाच्या पार्टीत त्यांची पत्नी, जया बच्चन यांनीही करिश्मा कपूर हिला ‘त्यांची होणारी सून’ म्हणून जाहीरपणे संबोधले होते. पण अचानक अभिषेक करिश्माचा साखरपुडा तुटल्याचं समोर आल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
2002 साली अभिषेक-करिश्माचा साखरपुडा झाला. तेव्हा करिश्मा कपूर ही तिच्या करीअरमध्ये खूप यशस्वी होती पण अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये त्याची ओळख निर्माण करण्यात, खंबीरपणे पाय रोवण्यात व्यस्त होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बच्चन कुटुंबाची आर्थिक स्थितीही त्यावेळी फारशी चांगली नव्हती.
बबिता कपूर यांना करायचं होत एक ‘ॲग्रीमेंट’
आपली मुल चांगलं आयुष्य जगावीत, त्यांचं भविष्य सुरक्षित असावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. करिश्माची आई आणि अभिनेत्री बबिता यांचीही अशीच इच्छा होती. करिश्माचं भविष्य चांगलं असावं, तिला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी बबिता यांना एक ‘ॲग्रीमेंट’ करायचं होतं, अशी चर्चा होती. पण त्या ‘ॲग्रीमेंट’ वर अमिताभ आणि जया बच्चन यांच्याही सह्या हव्या होत्या. मात्र अमिताभ बच्चन यांनी अशा कोणत्याही करारावर सही करणे नाकारले. त्यांनी बबिता यांना त्यांच्या तोंडावरच स्पष्टपणे नकार दिला.
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचं नातं तुटलं
यानंतर अचानकच अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचं नातं तुटलं, त्यांचा साखरपुडा मोडला. अभिषेक आणि करिश्माच्या ब्रेकअपची आलेली बातमी हा त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. त्यांची एंगेजमेंट कशी तुटली असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यानंतर 2003 साली करिश्मा कपूरने दिल्लीतील उद्योगपती संजय कपूर यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर करिश्माने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. मात्र, संजय कपूरसोबत करिश्माचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटादरम्यान करिश्मा – संजय यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केलं. करिश्मा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय याने तिसरं लग्न केलं. पण करिश्माने मात्र तिच्या दोन मुलांचा सिंगल पॅरेंट म्हणून सांभाळ केला.
तर अभिषेकने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याशी 2007 साली लग्न केले. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली, त्यांचे फोटो आणि व्हिडीओही खूप व्हायरल झाले. त्यांना आराध्या नावाची एक गोड मुलगी देखील आहे.