घटस्फोटाच्या जोरदार चर्चा… अभिषेक बच्चन याची नवी पोस्ट एका झटक्यात व्हायरल; काय आहे त्यात?

| Updated on: Jan 03, 2024 | 1:02 PM

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे यावेळी त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहेत. यांच्यामधील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर अजूनही बच्चन कुटुंबियांकडून अजिबातच भाष्य करण्यात नाही आले.

घटस्फोटाच्या जोरदार चर्चा... अभिषेक बच्चन याची नवी पोस्ट एका झटक्यात व्हायरल; काय आहे त्यात?
Follow us on

मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसून यांचे वाद टोकाला गेल्याचे सतत सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले आहे. ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेलंय. त्यामध्येच ऐश्वर्या राय हिने तिची साखरपुड्याची रिंग घालणे बंद केल्याने एकप्रकारे या गोष्टींना हवाच मिळाली. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद वाढल्याचे सांगितले जातंय.

फक्त हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे चर्चा देखील सतत सुरू आहे. घटस्फोटाची चर्चा असतानाच मुलगी आराध्या हिच्या स्कूलच्या प्रोग्राॅममध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे एकत्र दिसले. मात्र, यावेळी दोघे एकसोबत न येता वेगवेगळ्या गाड्यांमध्ये पोहचले. ज्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.

घटस्फोटाच्या तूफान चर्चा सुरू असतानाच आता अभिषेक बच्चन याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. अभिषेक याने लिहिले की, जर तुम्हाला हजारो लोकांसमोर चांगले दिसायचे असेल तर तुम्हाला नक्कीच हजारो लोकांसमोर सर्वांपेक्षाही जास्त मेहनत करावी लागेल. आता अभिषेक बच्चन याने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय.

घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच अभिषेक बच्चन याने अशाप्रकारची पोस्ट शेअर केल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. सतत गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगितले जातंय. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काही भाष्य केले नाहीये.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरोखरच घटस्फोट घेणार का? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काही भाष्य करण्यास तयार नाहीये. काही दिवसांपूर्वीच श्वेता बच्चन हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये चक्क ऐश्वर्या राय हिची तक्रार करताना श्वेता बच्चन ही दिसली. श्वेता बच्चन हिने ऐश्वर्या राय हिच्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत तेच थेट पणे सांगून टाकले.