AbhiShek Bachchan-Aishwarya Rai : घटस्फोटाच्या अफवांदरम्यान अभिषेकने ऐश्वर्यासाठी जे केलं..पाहून तुम्हीही म्हणाल,
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यात बेबनाव असल्याची चर्चा सुरू आहे.याचदरम्यान त्या दोघांचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे, जो पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्यात .
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यात बेबनाव असल्याची चर्चा सुरू आहे. दोघांचही एकमेकांशी पटत नाहीये, ते वेगळ राहतात, ऐश्वर्या मुलीसोबत राहते, अभिषेकचं दुसऱ्या अभिनेत्रीशी रिलेशन… एक ना दोन, अशा अनेक चर्चा या दोघांबाबत होत होत्या. मात्र बच्चन कुटुंब किंवा ऐश्वर्या -अभिषेक यांच्यापैकी कोणीच त्यावर मौन सोडलं नाही, ना प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर लोकं त्यांच्या नात्याबद्दल विविध कयास करत असतानाच ते मात्र शांतपणे आपलं जीवन जगत होते. मात्र आता याचदरम्यान सोशल मीडियावरच त्यांचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तो व्हिडीओ पाहून लोकं अभिषेकच्या कौतुकाचे पूल बांधताना दिसत आहेत. या व्हिडीओत ऐश्वर्या-अभिषेक यांच्या दरम्यान एक चांगलं बाँडिंग दिसत आहे.
गुरूवारी संध्याकाळी मुंबईत अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी दिसली. त्याचं कारण म्हणजे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील वार्षिक समारंभ. आराध्या बच्चनही याच शाळेत शिकत असून तिचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी ऐश्वर्या, अभिषेक आणि तिचे आजोबा, अमिताभ बच्चन हे देखील तेथे पोहोचले. या इव्हेंटसाठी आलेले अभिषेक-ऐश्वर्या एकत्रच दिसले. आणि अभिषेक त्यावेळी ऐश्वर्याची काळजी घेतानाही दिसला, दोघांनी शाळेत एकत्रच एंट्री केली.
अभिषेकने ऐश्वर्यासाठी केलं असं काही…
शाळेच्या गेटपाशी पोहोचताच अभिषेक ऐश्वर्याची काळजी घेतना दिसला. त्याने ऐश्वर्याचा हात पकडला आणि तिला पहिले आत जाण्यास सांगितलं. मागून कोणाचा धक्का लागू नये म्हणून तो तिला सपोर्ट करतानाही दिसला. त्याचा हाच केअरिंग अदांज लोकांना आवडला असून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेक जण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
चाहत्यांच्या कमेंट्स
ऐश्वर्याची काळजी घेणारा अभिषेक सर्वानांच भावला. अनेक चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. बघा, तो तिच्यावर किती प्रेम करतो, हे पाहून चांगलं वाटलं असं एका युजरने लिहीलं. दोघं नेहमी खुश राहोत, असं दुसऱ्या चाहत्याने लिहीलं. लव्ह बर्ड्स अशी कमेंटही आणखी एका चाहत्याने केली.
या वार्षिक समारंभासाठी केवळ अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच नाही तर अमिताभ बच्चनही त्यांच्यासोबत शाळेत पोहोचले. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बच्चन कुटुंबातील हे तीन सदस्य एकत्र दिसत आहेत.
गौरी-सुहानासह शाहरूखचीही एंट्री
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा धाकटा मुलगा अबरामही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. त्यामुळे हा ॲन्युअल डे अटेंड करण्यासाठी शाहरुखही शाळेत पोहोचला. त्याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. तो प्रचंड सुरक्षेत या कार्यक्रमाला तो उपस्थित राहिलाय त्यावेळी त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना देखील सोबत होत्या.
View this post on Instagram