..अन् मी 15 व्या वर्षापासूनच दारू पिऊ लागलो, अजय देवगनने पहिल्यांदाच सांगितली आयुष्यातील ती काळी बाजू
अभिनेता अजय देवगन नुकताच रणबीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता, यावेळी बोलताना आपण वयाच्या पंधराव्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केल्याचं त्याने म्हटलं आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर रोहित शेट्टी आणि अजय देवगन यांचा चित्रपट ‘सिंघम अगेन’ रिलीज झाला. ओपनिंग डे पासूनच हा चित्रपट सुपहिट ठरला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘सिंघम अगेन’चा हा दुसरा आठवडा आहे, दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सिंघम अगेन चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 206.50 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. त्यानंतर अभिनेता अजय देवगन हा एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता, त्यामध्ये त्याने आपल्या आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.
अभिनेता अजय देवगन नुकताच रणबीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता, यादरम्यान त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये अजय देवगनने म्हटलं की मी टीनएजमध्ये असतानाच दारू प्यायला सुरुवात केली होती. माझं वय जेव्हा पंधरा वर्ष होतं तेव्हा मी दारू प्यायला सुरुवात केली.मात्र यावेळी बोलताना अजय देवगन याने असं देखील म्हटलं की इतक्या कमी वयात जर तुम्ही दारू पीत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, अशी चूक तुम्ही करू नका.
दरम्यान तुम्ही वयाच्या पंधराव्या वर्षी दारू का प्यायला सुरुवात केली असा एक प्रश्न देखील या पॉडकास्टदरम्यान अजय देवगनला विचारण्यात आला. तेव्हा अजय देवगन याने सांगितलं की मला वाटत हे कदाचित पीयर प्रेशरमुळे झालं असेल. मित्रांच्या संगतीचा परिणाम असावा, माझ्या मित्रांमुळेच मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून दारू प्यायला लागलो. पुढे बोलताना अजय देवगन याने दारू न पिण्याचा सल्ला देखील दिला आहे. तो म्हणाला की जर लोकांना ठाऊक असंत दारू पीनं हे त्यांच्या शरीरासाठी योग्य नाही तर मग लोक दारू का पितात. ड्रिंक करू नका असा मी सल्ला देतो.अजय देवगनने हे देखील कबूल केलं की मला कितीही दारू पाजली किंवा मी पिलो तर ती मला चढत नाही. मात्र दुसरीकडे रोहित शेट्टी याने आपण दारू पीत नसल्याचं या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.