‘चुकीच्या माहितीमुळे माझं चारित्र्यहनन…,’ अल्लू अर्जून याचे तेलंगणाचे CM आणि ओवैसी यांना उत्तर
पुष्पा - २ चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या दिवशी चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा रुग्णालयात उपचार घेत असल्याने अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक देखील झाली होती. त्याच्यावर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी आणि AIMIM चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या टीकेला त्याने उत्तर दिले आहे.
‘पुष्पा – 2’ मधूनही बॉक्स ऑफीसवर पैशांचा पाऊस पाडणारा साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याच्यावर एका महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यानंतर सगळीकडून टिका होत आहे. त्याच्यावर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी विधीमंडळात टीका केली आहे. त्यास आता सुपरस्टार अल्लू अर्जून याने त्यांचे नाव न घेता उत्तर दिले आहे. अभिनेता अल्लू अर्जून याने शनिवारी आपल्या हैदराबाद येथील जुबली हिल्स स्थित निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आहे.या प्रेस कॉन्फरसला उशीरा आल्याबद्दल त्याने सर्वांची माफी मागितली. आपल्यास या धक्क्यातून सावरण्यास वेळ लागला आहे.संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला दुर्भाग्यपूर्ण सांगत अल्लू अर्जून याने पीडीत कुटुंबियाबद्दल आपली सहवदेना व्यक्त केली आहे. मला दर तासाला या महिलेच्या जखमी मुलाबद्दल अपडेट मिळत आहे. आता त्याची तब्येत सुधारत आहे. मुलाला आता बरे वाटत आहे ही आनंदाची घटना असल्याचे अभिनेता अल्लू अर्जून याने म्हटले आहे.
ही पत्रकार परिषद घेण्यामागे माझ्याबद्दल पसरविण्यात आलेले गैरसमज असल्याचे अल्लू अर्जून याने सांगितले. माझ्याबद्दल चुकीची माहिती दिली गेली आहे आणि खोटे केले आहेत. या चारित्र्यहननामुळे आपण व्यतिथ झालो आहोत आणि अपमानित झाल्याचे समजत आहोत. ज्यावेळी मला उत्सव साजरा करायला हवा, आनंदीत व्हायला हवे. त्या काळात मी पंधरा दिवसांपासून कुठे जाऊ शकलेलो नाही. कायदेशीररित्या मी बांधला गेलेलो आहे. मी थिएटरमध्ये जाऊ शकलो नाही असेही अल्लू अर्जून याने म्हटले आहे.
अल्लू अर्जून याने सांगितले की मी संपूर्ण तनमन झोकून हा चित्रपट केला आहे. मी चित्रपटात जी मेहनत घेतली ती स्क्रीनवर जाऊन पाहू देखील शकलेलो नाही. कारण मी अजूनही थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहीलेला नाही. हा कठीण अनुभव माझ्यासाठी वेगळा आहे. हा माझ्यासाठी शिकण्याचा मोठा प्रसंग आहे. माझ्यासाठी थिएटरमध्ये हा चित्रपट पाहणे आवश्यक होते. कारण आपल्या चुकातून आपण आणखी पुढे अभिनयात बदल करु शकतो असेही अल्लू अर्जून याने म्हटले आहे.
पोलिस स्वत: गर्दी हटवत होती…
तीन वर्षे काम केल्यानंतर इतकी मेहनत घेतल्यानंतर थिएटरमध्ये जाऊन या चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी मी चित्रपट पाहायला गेलो होतो. परंतू घडले भलतेच.यात कोणी बेजबाबदार नाही. मी गेली २५ ते ३० वर्षे एकाच थिएटरमध्ये जात आहे.आणि मी बेजबाबदारपणे विनापरवानगी थिएटरमध्ये गेलो हे बोलणे बरोबर नसल्याचे अल्लू अर्जून याने म्हटले आहे. आम्ही माहिती देऊनच थिएटरला गेलो होतो.थिएटर अथोरिटीने स्थिती सांभाळली आणि आम्ही आत जाताना पोलिस स्वत:गर्दी हटवत होती. आम्हाला वाटले सर्वकाही ठीक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. अनेक वेळा पोलिस येतात आणि सांगतात की आमच्याकडे परवानगी नाही.त्यामुळे आम्ही त्यांचे ऐकून निघून जातो.येथे पोलिस आम्हाला पुढे येण्याची परवानगी देत मार्ग मोकळा करीत होती.तेव्हा आम्ही हे गृहीत धरुन चाललो होतो की आमच्याकडे थिएटरमध्ये येण्याची परवागनी आहे.
अल्लू अर्जूनवर सीएम रेड्डी आणि आमदार ओवैसी यांचे आरोप काय ?
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अल्लू अर्जून पोलिसांच्या परवानगी शिवाय ‘पूष्पा-२’ च्या स्क्रिनिंगसाठी थिएटरमध्ये शिरले.थिएटरमध्ये एण्ट्री करताना आणि बाहेर येताना त्यांनी कारच्या सनरुफमध्ये उभे राहुन प्रेक्षकांना हात दाखवल्याने हजारो चाहत्यांनी आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी धक्काबुक्की केल्याचे रेड्डी यांनी म्हटले आहेत. ‘माझ्या माहिती प्रमाणे जेव्हा त्यांना चेंगराचेंगरीत एक महिला ठार झाल्याचे जेव्हा अभिनेत्याला सांगितले तेव्हा त्याने मग आता चित्रपट हिट होणार असे म्हटल्याचा दावा AIMIM चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरही अल्लू अर्जून याने चित्रपट पाहीला आणि जाताना कारमधून चाहत्यांना हात दाखवला, पण दुर्घटनेतील पीडीत कुटुंबाची विचारपूसही केली नसल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.