सरकार अजूनही चीनकडून पीपीई, मास्क का घेतंय? ‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचा सवाल
भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यानंतर अभिनेता अनुप सोनी यानेही आपलं मत व्यक्त केलं आहे (Actor Anup Soni asks Government to ban chinese products)
मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा फैलाव वुहानमधून झाल्यामुळे चीनमधून आयातीवर बहिष्कार टाका, अशी मागणी देशभरात जोर धरु लागली आहे. ‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेता अनुप सोनी यानेही ‘सरकार अजूनही चीनकडून पीपीई, मास्क का घेतंय?’ असा सवाल विचारला आहे. (Actor Anup Soni asks Government to ban chinese products)
‘मला हे समजतच नाही. लोक म्हणत आहेत चीनवर बंदी घाला, चिनी वस्तूंच्या निर्यातीवर बहिष्कार टाका. ही मागणी होत असतानाच सरकार अजूनही चीनकडून मोठ्या प्रमाणावर पीपीई, मास्क आणि व्हेंटिलेटर सारख्या उपकरणांची खरेदी करत आहे. ही गोष्ट माझ्या पचनी पडतच नाहीये. भारताच्या पुढाकाराचं काय होणार?’ असा प्रश्न अनुप सोनीने विचारला आहे.
Can’t understand this– pepole are saying ban china, ban chinese things but govt still buying PPE, Masks , ventilators etc in bulk from China…☹️ ये बात समझ में आई नही कुछ। And will happen to the Indian initiatives…?(Actor Anup Soni asks Government to ban chinese products)
— Annup Sonii (@soniiannup) April 16, 2020
अनुपने ट्विटरवर आपली भूमिका मांडल्यानंतर अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.
कोरोना विषाणूने भारतासह जगभरात थैमान घातलं आहे. भारतात ‘कोरोना’चे 1007 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या 13 हजार 387 वर गेली आहे. आतापर्यंत 437 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला असून देशातील सर्वाधिक रुग्ण असलेलं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रात 3200 हून अधिक रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. तर 194 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.
हेही वाचा : देश लॉकडाऊन, कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा जंगी विवाहसोहळा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी भारतातही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. कोरोनाच्या धोक्याविषयी चीनने लपवाछपवी केल्यामुळे कोरोना जगभर पसरल्याच आरोप केला जात आहे.
(Actor Anup Soni asks Government to ban chinese products)