Anupam Kher | ‘येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर

अनुपम खेर हे सोशल मीडियावर अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपचे उघडपणे समर्थन करताना दिसतात (Anupam Kher PM Narendra Modi)

Anupam Kher | 'येणार तर मोदीच' केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर
अनुपम खेर, नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 7:38 AM

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता (Shekhar Gupta) आणि दिग्गज अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्यामध्ये ट्विटरवर खडाजंगी झाली. कोरोना काळातील गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप शेखर गुप्ता यांनी केला. त्यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी ‘घाबरु नका, येणार तर मोदीच’ असं उत्तर दिलं. अनुपम खेर हे सोशल मीडियावर अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपचे उघडपणे समर्थन करताना दिसतात (Actor Anupam Kher replies to tweet by Journalist Shekhar Gupta supporting PM Narendra Modi)

काय होते ट्वीट?

“साठच्या दशकाचा मुलगा म्हणून मी अनेक संकटं पाहिली आहेत. ज्यात 3 पूर्ण युद्धं, अन्नटंचाई, नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश आहे. फाळणीनंतरचे हे आपल्यावरील सर्वात मोठे संकट आहे. मात्र भारताने कधीच सरकारचा अभाव पाहिलेला नाही. कॉल करण्यासाठी कोणतेही नियंत्रण कक्ष नाहीत, कोणीही जबाबदारी घेत नाही. हा प्रशासनाचा पराभव आहे” अशा शब्दात शेखर गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अनुपम खेर यांचे उत्तर

“शेखर गुप्ताजी, हे जरा अतीच झालं. अगदी तुमच्या स्टँडर्डपेक्षाही. कोरोना ही आपत्ती आहे. संपूर्ण जगासाठी. या महामारीचा सामना आपण यापूर्वी कधीच केला नव्हता. सरकारवर टीका करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यावर आरोप, टीका-टिपणी जरुर करा. पण त्याच्याशी (कोरोना) सामना करणं ही आपलीही जबाबदारी आहे. तसं तर घाबरु नका. येणार तर मोदीच !! जय हो!” अशा आशयाचं ट्वीट अनुपम खेर यांनी केलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा सातवा टप्पा आज पार पडत आहे. पुढच्या रविवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. ‘येणार तर मोदीच’ हा अनुपम खेर यांचा नारा त्याच पार्श्वभूमीवर असल्याचं बोललं जातं.

अनुपम खेर-मोदी यांचे जिव्हाळ्याचे संंबंध

यापूर्वीही अनुपम खेर अनेक वेळा पंतप्रधानांची पाठराखण करताना दिसले आहेत. पंतप्रधान मोदी आणि अनुपम खेर यांचे घनिष्ठ संबंध आहेत. जुलै 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अनुपम खेर यांनी लिहिले होते, की पंतप्रधान मोदी हे आपल्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहेत. नुकतेच अनुपम खेर यांनी ‘बेस्ट डे इज टुडे’ हे पुस्तक लिहिले. पंतप्रधान मोदींनीही या पुस्तकाचे कौतुक केले. अनुपम खेर सोशल मीडियावर भाजपचे उघडपणे समर्थन करतात. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री किरण खेर चंदिगढमधून भाजप खासदार आहेत.

संबंधित बातम्या :

आता फक्त किरणची काळजी, अनुपम यांनी अमेरिकन वेबसीरीजला म्हटले ‘गुडबाय’!

‘शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते’,अनुपम खेर यांचे धक्कादायक विधान

(Actor Anupam Kher replies to tweet by Journalist Shekhar Gupta supporting PM Narendra Modi)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.