Arjun Kapoor-Malaika Arora : इस प्यार को मैं… ब्रेकअपनंतरही मलायकाला अर्जुनची खंबीर साथ, वडिलांच्या निधनावेळी का होता सोबत ? स्पष्टच बोलला –
अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं नातं नेहमीच चर्चेत होतं. एकत्र असताना त्यांचे अनेक फोटो समोर यायचे, मात्र काही काळापूर्वी त्यांचे रस्ते वेगळे झाले. आपण सिंगल असल्याचं खुद्द अर्जुननेच कबूल केलं. मात्र असं असूनही काही महिन्यांपूर्वी मलायका अरोराच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा तो तिच्यासोबत खंबीरपणे उभा दिसला. तिच्या या कठीण काळात त्याने तिची साथ दिली. वेगळं होऊनही तो मलायका सोबत का होता, याचं उत्तर खुद्द अर्जुननेच दिलं आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबासाठी हे वर्ष खूपच कठीण होतं. सप्टेंबर महिन्यामध्ये मलायकाचे वडील अनिल मेहता यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. मात्र त्याबाबत अद्यापही काही स्पष्ट माहिती समोर नाही. हा काळ मलायका, तिची बहीण अमृता आणि त्यांच्या आईसाठी अतिशय कठीण होता. या कठीण समयी मलायकासोबत राहण्यासाठी, तिला खंबीर आधार देण्यासाठी तिचेन अनेक मित्र-मैत्रिणी होतो, पण सगळ्यात पहिले तिथे आला होता तो म्हणजे तिचा एक-बॉयफ्रेंड अर्जुन कपूर. नातं तुटूनही अर्जून हा मलायकाच्या घरी लागलीच पोहोचला. एका इंटरव्ह्यूदरम्यान अर्जुन याबद्दल स्पष्टपणे बोलला. नातं तुटल्यानंतर वडिलांच्या निधनाच्या प्रसंगी अर्जुन मलायाकासोबत का होता, याचं उत्तर त्यानेच दिलं आहे.
मलायकाची साथ का दिली ?
रिपोर्ट्सनुसार, एका इंटरव्ह्यूदरम्यान अर्जुनला याविषयी विचारण्यात आलं. ‘ माझे बाबा ( बोनी कपूर) आणि खुशी-जान्हवी यांच्यासोबत जेव्हा अशी घटना घडली ( श्रीदेवी यांचा मृ्त्यू) तेव्हा ( तिथे असणं) एक भावनेच्या भरात घेतलेला निर्णय होता. आणि त्या वेळीही ( मलायकाच्या वडिलांचे निधन) मी भावनिकतेनेच हा निर्णय घेतला, असं अर्जुनने नमूद केलं. माझा जर एखाद्या व्यक्तीशी इमोशनला बाँड असेल तर चांगलं काय नी वाईट काय, याचा विचार न करता मी तिथे त्यांच्यासोबत असतो. चांगल्या प्रसंगी मला बोलावलं मी तिथे (हजर) असेन, वाईट प्रसंगी मला हाक मारली तर तेव्हाही मी तिथे आवर्जून जाईन. मला खूप सारे मित्र नाहीत., मी हे सगळ्यांसाठी करत नाही. एखाद्या व्यक्तीला मी ( तिथे, त्या प्रसंगी) नको असेन तर मी तिथून दूरच राहतो. असं मी याआधीही केलंय’ असं अर्जुनने सांगितलं.
नात्यात कोणत्या गोष्टींची भीती ?
माझ्या कोणत्याही नातेसंबंधात महत्त्वाची भूमिका बजावणारी एक गोष्ट म्हणजे (व्यक्ती) गमावण्याची भीती. माझी आई, माझे काही पाळीव प्राणी आणि आसपासच्या अनेक व्यक्ती गमावल्यामुळे माझ्या मनात आता गमावण्याची भीती निर्माण झाली आहे, असं अर्जुन म्हणाला. मी ही भीती घालवण्यासाठी प्रयत्न करतोय, नाही असं नाही, पण भूतकाळात जे घडलं त्याचा परिणाम माझ्या नात्यांवर होतो, असंही अर्जुनने नमूद केलं.
अर्जुन मलायकाचं नातं
अभिनेता अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूरला डेट करत होती. गेले कित्येक वर्ष त्यांचं नातं होतं, मात्र काही काळापूर्वी त्या दोघांचं ब्रेकअप झालं. दिवाळी पार्टीदरम्यान अर्जुननेच त्याबद्दल सांगितलं. मी आता सिंगल आहे, असं अर्जुनने स्वत: कबूल केलं होतं. पण मलायकाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.