‘असंभव’, ‘साथ दे तू मला’, ‘चेकमेट’ यासारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आशुतोष कुलकर्णी नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.
आशुतोषची पत्नी रुचिका पाटील देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. 'गणपती बाप्पा मोरया', 'असे हे कन्यादान' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
रुचिका पाटीलने इंजिनिअरिंगची शिक्षण पूर्ण केलं असून, 2014मध्ये ती ‘श्रावण क्वीन’ या स्पर्धेमध्ये ती सेकेंड रनरप ठरली होती.
अत्यंत साधेपणाने हा विवाहसोहळा संपन्न झाला असून, या लग्नसोहळ्याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि तीचा पती दुर्वेश देशमुख, तसेच अभिनेत्री सायली देवधर यांनी आशुतोष-रुचिका यांच्या लग्नात हजेरी लावली होती.