Happy Birthday Atul Kulkarni: ‘चांदणी बार’ मधून चमकले अभिनेता अतुल कुलकर्णीचे नशीब ; हिंदीसह सात भाषांमध्ये गाजवली कारकीर्द

अतुल कुलकर्णी यांना 'चांदनी बार' आणि 'हे राम'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यानंतर ते 'रंग दे बसंती', 'पेज 3', 'द अटॅक ऑफ 26/11', 'दिल्ली 6', 'द गाझी अटॅक', 'ए थर्सडे ' यासह अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये दिसला. खलनायकच्या भूमिकेतून अभिनय करता असताना त्यांनी स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला.

Happy Birthday Atul Kulkarni: 'चांदणी बार' मधून चमकले अभिनेता अतुल कुलकर्णीचे नशीब ; हिंदीसह सात भाषांमध्ये गाजवली कारकीर्द
Atul Kulkarni Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 10:46 AM

अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) हे बॉलीवूडमधील अशा काही कलाकारांपैकी एक आहेत, ज्यांची गणना सर्वोत्कृष्ट अभिनेता (Actor)म्हणून केली जाते. आज 10 सप्टेंबर रोजी  अतुल कुलकर्णी आपला 57  वाढदिवस साजरा करत आहेत. 1965 रोजी कर्नाटकात जन्मलेले अतुल कुलकर्णीनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम भूमिका साकारल्या. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी मराठी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनयाची छाप पडली आहे. बऱ्याच चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या (villain) भूमिका गाजल्या आहेत. प्रेक्षकांनी अगदी त्यांना डोक्यावर घेतले.

असा सुरू झाला अभिनयाचा प्रवास

अतुल कुलकर्णी यांनी सुरुवातीचे शिक्षण कर्नाटकातून केले. दहावीत असताना त्यांनी पहिल्यांदा अभिनयात हात आजमावला. त्यानंतर कॉलेजच्या दिवसांतच त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला आणि अभिनयातील बारकावे शिकून घेतले. त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा केला आणि अभिनेता बनण्याचे स्वप्न पूर्ण करत 1997 मध्ये कन्नड चित्रपट ‘भूमी गीता’मधून पदार्पण केले. यानंतर ते 2000 मध्ये ‘हे ​​राम’ चित्रपटात दिसले .

चांदनी बार चित्रपटाने पालटले नशीब

2001 मध्ये आलेल्या मधुर भांडारकरच्या ‘चांदनी बार’ या चित्रपटाने अतुल कुलकर्णीचे नशीब बदलून टाकले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले ते प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाले. एवढेच नाही तर अतुल कुलकर्णी यांना ‘चांदनी बार’ आणि ‘हे राम’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यानंतर ते ‘रंग दे बसंती’, ‘पेज 3’, ‘द अटॅक ऑफ 26/11’, ‘दिल्ली 6’, ‘द गाझी अटॅक’, ‘ए थर्सडे ‘ यासह अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये दिसला. खलनायकच्या भूमिकेतून अभिनय करता असताना त्यांनी स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला. चित्रपटांमधील यशासोबतच, अतुल कुलकर्णीने 2018 मध्ये ‘द टेस्ट केस’ द्वारे OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. यानंतर तो ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘बंदिश डाकू’, ‘रुद्र: द इज ऑफ डार्कनेस’सह अनेक मालिकांमध्ये ही ते दिसून आले. अलीकडेच पटकथा लेखक म्हणून त्याचा पहिला चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा रिलीज’ होता, ज्यामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत होता. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

हे सुद्धा वाचा

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.