Govinda : चाहत्याला थप्पड तर कधी भाच्याशी भांडण, गोविंदाचं नाव घेताच आठवतात हे विवाद
राजा बाबू, बडे मिया छोटे मिया, कूली नंबर 1, हिरो नंबर 1, साजन चले ससुराल हे आणि यासारखे एकाहून एक सरस देणाऱ्या गोविंदाची एकेकाळी प्रचंड क्रेझ होती. काही महिन्यांपूर्वी त्याच्या बंदुकीतून मिसफायर होऊन त्याच्या पायाला गोळी लागली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती बरी व्हावी यासाठी त्यावेळी त्याच्या लाखो चाहत्यांनी प्रार्थना केली.
90च्या दशकात बॉलिवूडमध्ये धूमाकूळ घालणारा अभिनेता गोविंदा याचे आजही कोट्यवधी चाहते आहेत. राजा बाबू, बडे मिया छोटे मिया, कूली नंबर 1, हिरो नंबर 1, साजन चले ससुराल हे आणि यासारखे एकाहून एक सरस देणाऱ्या गोविंदाची एकेकाळी प्रचंड क्रेझ होती. काही महिन्यांपूर्वी त्याच्या बंदुकीतून मिसफायर होऊन त्याच्या पायाला गोळी लागली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती बरी व्हावी यासाठी त्यावेळी त्याच्या लाखो चाहत्यांनी प्रार्थना केली. आपल्या दिलखुलास हास्याने सर्वांना भुलवणाऱ्या आणि नृत्याने सर्वांना ठेका धरायला लावणाऱ्या गोविंदा याचा आज, अर्थात 21 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो.
मात्र प्रेक्षकांचा अत्यंत लाडका असलेल्या या स्टारचे वादविवादांशीही जुनं नातं आहे. त्याचे अनेक जुने वाद आहेत, ज्यामुळे तो बराच चर्चेत होता. चाहत्याला मारलेली थप्पड असो किंवा भाच्चा कृष्णा याच्याशी झालेला वाद, गोविंदाचे बरेच वाद गाजले. काही दिवसांपूर्वी त्याच्या बंदुकीतून मिसफायर होऊन त्याचा पाय जखमी झाल्याने गोविंदा पुन्हा चर्चेत आला होता. काही दिवस रुग्णालयात काढल्यानंतर तो बरा झाला आणि घरी परतला. विशेष म्हणजे या दुर्दैवी घटनेनंतर त्याचा भाचा, अभिनेता कृष्णा अभिषेकही त्याला भेटण्यासाठी घरी गेला होता आणि त्यांच्यातील वादही मिटल्याची चर्चा होती.
गोविंदाशी निगडीत विविध वाद कोणते, जाणून घेऊया.
चाहत्याला मारली थप्पड
2008 मध्ये, हनी है तो मनी है या चित्रपटाच्या सेटवर गोविंदाने त्याच्या एका चाहत्याला थप्पड मारली तेव्हा गदारोळ माजला होता. खरंतर त्यावेळी गोविंदा हा फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये त्याच्या चित्रपटाचं शूटिंग करत होता, तेव्हा संतोष राय नावाचा एक चाहता ते शूटिंग पाहण्यासाठी तिकडे आला होता. मात्र त्याच संतोषला गोविंदाने सगळ्यांसमोरच कानाखाली लगावली. त्याने एका महिलेशी गैरवर्तन केल्याने आपण त्याला मारल्याचा दावा गोविंदाने केला. मात्र चाहत्याने सर्व आरोप फेटाळून लावले आणि आपण फक्त शूटिंग पाहत असल्याचे त्याने सांगितले. हे प्रकरण तेव्हा प्रचंड गाजलं होतं.
डेव्हिड धवनसोबत वाद
गोविंदाशी संबंधित वादांमध्ये त्याचे चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबत बिघडलेलं नातंही खूप चर्चेत होते. एकेकाळी गोविंदा-डेविड धवनची जोडी खूप प्रसिद्ध होती. या जोडीने अनेक हिट चित्रपट एकत्र दिले आहेत. पण एका भांडणानंतर त्याचं नातं संपलं. गोविदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी या वादामागचे कारण सांगितलं होतं. डेव्हिड धवनने गोविंदाला दुय्यम भूमिका करण्यास सांगितल्याच्या मुद्द्यावरूनच दोघांमध्ये भांडण झाल्याचे तिने सांगितले. मात्र, अनेक वर्षांनी त्यांनी एकमेकांशी बोलून गैरसमज दूर करत भांडण मिटवलं.
1000 कोटींचा स्कॅम
1000 कोटी रुपयांच्या पॅन इंडिया ऑनलाइन पॉन्झी घोटाळ्यातही गोविंदाचे नाव जोडले गेले होते. मात्र या सर्व अर्धवट बातम्या आहेत, या प्रकरणाशी अभिनेत्याचा काहीच संबंध नाही, असा दावा त्याच्या मॅनेजरने केला होता. या घोटाळ्याअंतर्गत लाखो रुपये जमा करण्यात आले. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, झारखंड आणि इतर राज्यांतील लोकांनीही यात पैसे गुंतवले होते.
राणी मुखर्जीशी नातं
गोविंदाचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं, अभिनेत्री नीलमसोबतच्या नात्याची त्याने पुष्टीही केली होती. मात्र रानी मुखर्जी आणि त्याचं नातं सगळ्यात चर्चेत आलं होतं. हद कर दी आपने चित्रपटाच्या सेटवर त्यांचं नात सुरू झाल्याची चर्चा होती. मात्र तेव्ह गोविंदाचं लग्न झालं होतं. राणीशी नाव जोडलं गेल्याने त्याचं लग्न संकटात सापडलं होतं, अखेर त्या दोघांनी ( राणी- गोविंदा) नातं संपवण्याचा निर्णय घेतलाय
भाच्यासह वाद
गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद सर्वाधिक चर्चेत होता. नुकातच त्यांच्यातील कटुता दूर झाली आणि ते पुन्हा एकत्र आले. मीडिया रिपोर्टनुसार, एका कॉमेडी शोमध्ये कृष्णा अभिषेकने केलेला जोक गोविंदाची पत्नी सुनिता हिला आवडला नाही. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह हिनेही त्यात सहभाग घेतल्याने प्रकरण आणखीनच चिघळलं. दोन्ही अभिनेत्यांनी एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले होते. काही महिन्यांप्रीव पायाला गोळी लागून गोविंदा रुग्णालयात दाखल झाला, तेव्हा आधी कााश्मिरा शाह आणि नंतर कृष्णाने मामाची भेट घेत मतभेद, वाद मिटवले होते.
ट्विट भोवलं
हरियाणातील दंगलींबाबतचे एक ट्विट समोर आल्याने गोविंदाही चर्चेत आला होता. या प्रकरणानंतर त्याला खूप त्रास सहन करावा लागला. मात्र, नंतर गोविंदाने त्यावर आपले स्पष्टीकरण दिले. अनेक दिवसांपासून ट्विटर न वापरल्याने आपला आयडी हॅक झाल्याचा दावा त्याने केला होता.
16 कोटीचं नुकसान
इंडस्ट्रीतल्या लोकांनी आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोपही गोविंदाने केला होता. गेल्या 14-15 वर्षांत मी खूप पैसे गुंतवले असून सुमारे 16 कोटी रुपयांचे नुकसान झाले असे त्याने म्हटले.. माझ्याच इंडस्ट्रीतील काही लोकांनी मला वाईट वागणूक दिली, असा आरोपही त्याने केला होता.