Ishaan Khattar | अनन्या पांडेशी ब्रेकअपनंतर ईशान खट्टर पुन्हा पडला प्रेमात ? कोण आहे त्याची ‘ड्रीम गर्ल’ ?
Ishaan Khattar Again In Love : ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांच्या डेटिंगबद्दल बरीच चर्चा होती. मात्र दोघांचं ब्रेकअप झाल्याची बातमी आल्यानंतर त्याच्या चाहत्याचं मन दुखावलं. पण आता ईशान पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे वृत्त आहे. कोण आहे त्याची 'ड्रीम गर्ल' ?
Ishaan Khattar Break Up With Ananya Panay : अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khattar) आणि अभिनेत्री अनन्या पांडे (ananya Pandey) या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल बरीच चर्चा सुरू होती. मात्र काही काळापूर्वी त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त समोर आल्याने चाहते नाराज झाले होते. अनन्यापासून वेगळं झाल्यानंतर आता ईशानच्या आयुष्यात नवं प्रेम आल्याची चर्चा आहे. सध्या त्याचं नाव एक मलेशियन मॉडेलशी जोडलं जात आहे. मात्र ती मिस्ट्री गर्ल कोण आहे, हे माहीत आहे का ?
कुणाच्या प्रेमात पडला ईशना खट्टर ?
ईशान खट्टरचं त्याच्या बाईकवर खूपच प्रेम आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ईशान बाईकवरून जात असताना त्याच्यासोबत एक मुलगी दिसली होती. तिला पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ती मुलगी अखेर कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्याचे चाहतेही त्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होते. मात्र आता हे गुपित उघड झाले आहे! मिळालेल्या माहितीनुसार, ईशान हा सध्या एक मलेशियन मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्रीला डेट करत आहे. चांदनी बेंज असे या अभिनेत्रीचे नाव आहे. एका रिपोर्टनुसार, ते दोघेही एकमेकांप्रती खूप सीरियस आहेत. ईशानने चांदनीची त्याच्या जवळच्या मित्रांशीही ओळख करून दिली आहे. इशान आणि चांदनी जून महिन्यापासून एकमेकांना डेट करत आहेत.
कोण आहे चांदनी बेंज ?
चांदनी ही मलेशियातील क्वालालांपूर येथील रहिवासी आहे. ‘माय मदर्स स्टोरी’ या सिंगापूरमधील टीव्ही ड्रामाद्वारे ती खूप लोकप्रिय झाली . त्याशिवाय तिने मलेशिअन टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. सध्या चांदनी ही भारतात असून ती मॉडेलिंग करते. बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासही ती उत्सुक असून चित्रपटांमध्ये करिअर करण्याची तिची इच्छा आहे.
अनन्याला डेट करत होता ईशान खट्टर !
याआधी ईशान व अनन्या एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनी खाली पीली या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या रोमान्सला सुरुवात झाली. ईशानने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा पिप्पा हा देशभक्तीपर चित्रपट लवकरच येणार आहे.