ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन
मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध चरित्र (Jairam Kulkarni Passed Away) अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
पुणे : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध चरित्र (Jairam Kulkarni Passed Away) अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. पुण्यात आज (मंगळवारी) पहाटे त्यांचे निधन झाले. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत (Jairam Kulkarni Passed Away) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : शंभरावं अ. भा. मराठी नाट्य संमेलन पुढे ढकललं, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्णय
सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या अनेकविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता (Jairam Kulkarni Passed Away). जवळपास 100 मराठी आणि हिंदी चित्रपटांमधे त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. ‘झपाटलेला, माहेरची साडी, नवरी मिळे नवरयाला, आमच्या सारखे आम्हीच’ अश्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.
जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या. काही दिवसांपूर्वीच जयराम यांनी भूमिका साकारलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, इत्यादी चित्रपटातील (Jairam Kulkarni Passed Away) त्यांच्या भूमिकां अजरामर ठरल्या.
संबंधित बातम्या :
निलेश साबळेंच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा, खासदार संभाजीराजेंकडून माफीची मागणी
महापुरुषांच्या फोटोचा गैरवापर केल्याचा आरोप, निलेश साबळेंची जाहीर माफी
भाऊ, कुशल, निलेश साबळेंविरोधात ‘संभाजी ब्रिगेड’ची पोलिसात तक्रार
Corona | देशभरात टीव्ही मालिका-चित्रपटांचं शूटिंग 31 मार्चपर्यंत बंद