Happy Birthday Javed Jaffrey | केवळ अभिनयच नव्हे तर, मनोरंजन विश्वातल्या ‘या’ क्षेत्रांमध्येही जावेद जाफरीच्या नावाचा दबदबा!

आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा अभिनेता जावेद जाफरी (Javed Jaffery) आज आपला 57 वा वाढदिवस साजरा करीत आहे.

Happy Birthday Javed Jaffrey | केवळ अभिनयच नव्हे तर, मनोरंजन विश्वातल्या ‘या’ क्षेत्रांमध्येही जावेद जाफरीच्या नावाचा दबदबा!
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 11:19 AM

मुंबई : आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा अभिनेता जावेद जाफरी (Javed Jaffrey) आज आपला 57 वा वाढदिवस साजरा करीत आहे. जावेद जाफरी यांचा जन्म 4 डिसेंबर 1963 रोजी मल्लीवाला येथे झाला होता. अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या जावेद जाफरी यांनी मनोरंजन विश्वात अनेक भूमिका पार पडल्या आहेत. जावेद जाफरी यांनी मुख्य अभिनेता म्हणून फारसे काम केले नाही. परंतु, एक सहाय्यक अभिनेता म्हणून त्याच्या अभिनयाची खूप चर्चा झाली (Actor Javed Jaffrey Birthday Special).

जावेद जाफरी अभिनयासह उत्तम नृत्यही सादर करतो. ‘मेरी जंग’ या पहिल्या चित्रपटात त्याने ‘बोल बेबी बोल’ या गाण्यावर नृत्य केले होते. त्याच्या या गाण्याने आणि नृत्यशैलीने अवघ्या तरुणाईला वेद लावले होते. जावेद जाफरी केवळ अभिनेता आणि डान्सरच नाही तर, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आणि एक हुशार कॉमेडियन देखील आहेत. त्याने मिकी माऊ ते गूफीपर्यंत अनेक कार्टूनसाठी आवाज डब केले आहेत. ‘ताकेशीस कास्टल’ या त्याच्या कार्यक्रमाचे चाहते जगभरात आहेत.

(Actor Javed Jaffrey Birthday Special).

‘बुगी वूगी’मुळे जावेदची चर्चा…

जावेदने ‘बुगी वूगी’ या पहिल्या भारतीय नृत्य कार्यक्रमातून सुत्रसंचालनाला सुरूवात केली होती. या शोमध्ये जावेदचा भाऊ नावेददेखील दिसला होता. ‘बुगी वूगी’ने 15 वर्षात इंडस्ट्रीला अनेक उत्तम नर्तक दिले आहेत. हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत राहिला आहे. यानंतर जावेद जाफरी जाहिरात क्षेत्रातही सक्रिय झाला आहे. 1980 पासून जाहिरात क्षेत्रात तो मॉडेल, नृत्यदिग्दर्शक, कॉपीरायटर, निर्माता-दिग्दर्शक म्हणून काम करत आहे (Actor Javed Jaffrey Birthday Special).

जावेद जाफरीने वडील ‘जगदीप’ यांच्याप्रमाणेच विनोदातून प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळविण्याचा निर्धार केला होता. बहुतेक चित्रपटांमध्ये जावेद विनोदी भूमिका साकारताना दिसला आहे. त्याच्या विनोदीशैलीचे चाहते जगभरात आहेत. जावेद जाफरीने ‘तहलका’, ‘ओ डार्लिंग ये है इंडिया’, ‘अर्थ’, ‘3 इडियट्स’, ‘डबल धमाल’, ‘जजंतरम ममंतरम’, ‘सलाम नमस्ते’, ‘ता रा रम पम’, ‘धमाल’, ‘सिंग इज किंग’ यासह अनेक चित्रपटात काम केले आहे.

लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

वरुण धवन आणि सारा अली खानसमवेत जावेद जाफरी लवकरच ‘कुली नंबर 1’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ख्रिसमस’च्या निमित्ताने हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासमवेत जावेद ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसणार आहे.

(Actor Javed Jaffrey Birthday Special).

संबंधित बातम्या : 

PHOTO | ‘फत्तेशिकस्त’च्या ‘या’ जोडीच्या लग्नाचा वाढदिवस दणक्यात साजरा, पाहा खास फोटो..

PHOTO | ‘लिटील मिस सनशाईन’ प्रिया बापटचे हे ‘क्युट’ फोटो तुम्ही पाहिलेत का?

(Actor Javed Jaffery Birthday Special)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.