नरेंद्र मोदींच्या आवाहनावर अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पंचनामा’
संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं (Kartik Aaryan video viral) आहे.
मुंबई : संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं (Kartik Aaryan video viral) आहे. काल (19 मार्च) संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी महत्त्वाचे मुद्दे नगारिकांसोबत शेअर केले. मोदींच्या या मुद्द्यांवरुन अभिनेता कार्तिक आर्यनने नागिरकांना घरात बसण्याचे आवाहन केले आहे. कार्तिकचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर (Kartik Aaryan video viral) होत आहे.
या व्हिडीओमध्ये कार्तिकने सर्व नागिरकांना घरी बसण्याचे आवाहन करत आहे. त्यासोबत जे सरकराने सांगितल्या प्रमाणे पालन करत नाही, त्यांनाही कार्तिकने घरी बसण्याची विनंती केली आहे. जे लोक वर्क फ्रॉम करत नाहीत, तसेच काही लोक वर्क फ्रॉम होमचा गैरफायदा घेत आहेत, अशा कर्मचाऱ्यांची खरडपट्टीही कार्तिकने काढली. अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या चाहत्यांना मोंदीनी दिलेली माहिती शेअर करत आहेत.
#CoronaStopKaroNa My Appeal in my Style Social Distancing is the only solution, yet ??@narendramodi we are with you Sir !! pic.twitter.com/qhQBZSdFAd
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) March 19, 2020
“सुरक्षित राहा. आपल्यालाही सुरक्षा करावी लागेल. तेव्हाच त्या व्हायरसचा आपण खात्मा करु शकतो. इटलीच्या लोकांनी एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, सुरुवातीला आम्ही खूप चुका केल्या होत्या आणि आज अशी परिस्थिती आली की आम्हाला या व्हायरसवर कंट्रोल करता येत नाही”, असं कार्तिकने त्या व्हिडीओमध्ये सांगितले.
‘प्यार का पंचनामा’ सिनेमात कार्तिक आर्यनचा डायलॉग गाजला होता. त्याच स्टाईलमध्ये कार्तिकने मोदींच्या आवाहनाला जोरदार पाठिंबा दर्शवला आहे
बॉलिवूड इंडस्ट्रीही कोरोनासोबत लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. बऱ्याच मोठ्या चित्रपट आणि कार्यक्रमांची शूटिंग रद्द करण्यात आली आहे. स्टार्स सलग आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. कारण अनेक कलाकार आता आपल्या घरी वेळ घालवत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (19 मार्च) जनता कर्फ्यूची घोषणा केली. देशभरात येत्या रविवारी म्हणजेच 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू लागू करणार असल्याचं मोदी म्हणाले. हा कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री 8 वाजता संपूर्ण देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली.