Kartik Aryan : कार्तिक आर्यनच्या आईने जिंकले कॅन्सरविरोधातील युद्ध, अभिनेत्याने शेअर केली इमोशनल पोस्ट
Kartik Aryan Mother Cancer : अभिनेता कार्तिक आर्यन आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून बाहेर आला आहे. कार्तिकच्या आईने कॅन्सरला हरवून जीवनाची लढाई जिंकली आहे. यासंदर्भातील एक इमोशनल पोस्ट त्याने नुकतीच शेअर केली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik aryan) सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. आजच्या तारखेला तो अतिशय लोकप्रिय स्टार असून त्याच्या खात्यात अनेक चांगल्या भूमिका आहे. प्रोफेशनल आयुष्यात यशाची शिखरे चढणारा कार्तिक पर्सनल आयुष्यात मात्र कठीण काळातून जात होता. कार्तिक आर्यनची आई (Kartik aryan mother) माला तिवारी यांनी कॅन्सरसारख्या (cancer) धोकादायक आजारावर मात करून जीवनाची लढाई जिंकली आहे. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक अतिशय भावूक पोस्ट शेअर केली.
ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की, गेल्या काही महिन्यांमध्ये तो आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून गेला होता, पण आता तो त्याच्या सुखद प्रवासाकडे वाटचाल करत आहे. कार्तिकने सांगितले की त्याच्या आईने सर्वात मोठा -C सी म्हणजेच Cancer (कर्करोग) वर मात केली आहे. अभिनेत्याने हा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
कार्तिक आर्यनने त्याच्या आईच्या धाडसाचे आणि जीवन जगण्याच्या इच्छेचे, चांगुलपणाचे कौतुक केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर आईसोबतचा फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. ” कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा यापेक्षा आयुष्यात मोठे काहीही नाही,” असे म्हणत कार्तिकने त्या कठीण काळाबद्दल सांगितले आहे.
View this post on Instagram
कार्तिकने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे- ‘ Big C – ‘कॅन्सर’ आमच्या घरात घुसला आणि आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आम्ही हताश, निराश आणि असहाय होतो. पण माझी आई, एक अतिशय लढाऊ सैनिक आहे, तिचे आभार…. तिची इच्छाशक्ती आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीने (या आजारावर) विजय मिळवला. आम्ही मोठ्या ‘हिंमतीने’ आणि पूर्ण ताकदीने लढलो आणि जिंकलो. मात्र, यावरून एक गोष्ट समजली की आपल्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्यापेक्षा (कोणतीही)मोठी शक्ती नाही. ” अशी इमोशनल पोस्ट कार्तिकने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
कार्तिक आर्यनच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. काही काळापूर्वी कार्तिनने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो त्याच्या आईच्या कॅन्सरबद्दल बोलताना खूप भावूक झाला होता. केमोथेरपी सत्रासंबंधी सांगताना, तेव्हा कार्तिकचे डोळे भरून आले. आता मात्र त्याच्या कुटुंबाने ही लढाई जिंकली आहे.
View this post on Instagram
कार्तिक त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. अनेकदा तो आईसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. कार्तिकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता अलीकडेच शहजादा चित्रपटात दिसला होता, जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला नाही. आता अशी बातमी आहे की कार्तिक आर्यन लवकरच कबीर खानच्या पुढच्या चित्रपटात त्याचा ॲक्शन अवतार दाखवणार आहे.