Manoj Bajpayee | अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण, स्वतःला केले क्वॉरंटाईन!

अभिनेता मनोज बाजपेयीची (Manoj Bajpeyee) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. मनोज कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी एनआयने दिली असून, ते क्वॉरंटाईन झाले आहेत.

Manoj Bajpayee | अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण, स्वतःला केले क्वॉरंटाईन!
मनोज बाजपेयी
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 4:15 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या कोरोना विषाणूचा फैलाव होताना दिसतोय. अभिनेता रणबीर कपूर आणि चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांना अलीकडेच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, अभिनेता मनोज बाजपेयीची (Manoj Bajpeyee) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. मनोज कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी एनआयने दिली असून, ते क्वॉरंटाईन झाले आहेत. मनोज बाजपेयी हे सध्या आपल्या नव्या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन 2’ची चाहत्यांची खूप प्रतीक्षा होती. अशा परिस्थितीत अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे, त्यांचे चाहते अस्वस्थ झाले आहेत (Actor Manoj Bajpayee has tested corona positive).

अभिनेते मनोज बाजपेयी यांनी आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. ते नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. अशा परिस्थितीत चाहते आता, मनोज बाजपेयी यांना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करत आहेत.

मनोज बाजपेयींना कोरोनाची लागण

(Actor Manoj Bajpayee has tested corona positive)

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मनोज बाजपेयी यांनी स्वत:च्या घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सध्या मनोज बाजपेयी त्यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होते, असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान, त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे कळते आहे. आता या चित्रपटाचे शूटिंग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे (Actor Manoj Bajpayee has tested corona positive).

या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिनेता मनोज बाजपेयी यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती, या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे, असे मनोज बाजपेयी यांच्या टीमने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. या क्षणी, मनोज बाजपेयी ठीक असून, त्यांनी घरीच स्वत:ला अलगीकरणात ठेवले आहे आणि ते स्वतःची संपूर्ण काळजी घेत आहे.

रणबीरला कोरोनाची लागण

अलीकडेच अभिनेता रणबीर कपूरच्या आईने अर्थात अभिनेत्री नीतू सिंग यांना माहिती देताना सांगितले की, ‘आपल्या सर्व चिंता आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. रणबीरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो औषधे घेत आहे आणि आता त्याची प्रकृती सुधारत आहे. त्याने स्वत:ला क्वॉरंटाईन केलेले आहे आणि त्याबद्दल सर्व प्रकारच्या खबरदारी तो घेत आहेत.’ गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चंदिगडमध्ये ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री नीतू कपूर यांना स्वत:ला देखील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करावा लागला होता, तेथूनच त्यांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात आले होते.

(Actor Manoj Bajpayee has tested corona positive)

हेही वाचा :

50 Years Of Anand | महानायक अमिताभ बच्चन यांना ओळख मिळवून देणारा चित्रपट ‘आनंद’, वाचा याचे खास किस्से…

Alia Bhatt | ‘पॅशनेट अबाऊट वर्क’, कोरोना चाचणी निगेटिव्ह येताच कामावर परतली आलिया भट्ट!

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....