Rahul Roy | ‘ब्रेनस्ट्रोक’मुळे राहुल रॉयच्या शरीराची डावी बाजू प्रभावित, कुटुंबियांचे चाहत्यांना आवाहन…

गेल्या 2/3 दिवसांपासून राहुल रॉय नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये आणण्यात आले आहे.

Rahul Roy | ‘ब्रेनस्ट्रोक’मुळे राहुल रॉयच्या शरीराची डावी बाजू प्रभावित, कुटुंबियांचे चाहत्यांना आवाहन...
लग्नानंतर ते चित्रपटसृष्टीपासून लांब गेले आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले. कालांतराने प्रेक्षक त्यांना विसरलेही होते.
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 2:06 PM

मुंबई : ‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉय ‘ब्रेनस्ट्रोक’मुळे सध्या मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते आहे. मात्र, या स्ट्रोकमुळे त्यांच्या शरीराचा डावा भाग प्रभावित झाल्याचे समजते आहे (Rahul Roy Health Update). माध्यमांच्या अहवालानुसार, राहुल यांच्या चेहऱ्याची डावी बाजू ब्रेन स्ट्रोकमुळे प्रभावित झाली आहे. तर, त्यांचा डावा हातदेखील कमजोर झाला आहे. ‘ब्रेनस्ट्रोक’मुळे त्यांना अफेजिया नामक आजार झाल्याचे बोलले जात आहे (Actor Rahul Roy Health Update).

यामुळे राहुल रॉय यांना नीट बोलताही येत नाही. तसेच ते काही वाक्य देखील सरळ बोलून शकत नाहीयत. गेल्या 2/3 दिवसांपासून राहुल रॉय नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये आणण्यात आले आहे.

तुमच्या प्रार्थनांची गरज…

मंगळवारी (2 डिसेंबर) राहुल रॉय यांचे नातेवाईक रोमीर सेन यांनी त्यांच्या तब्येती संदर्भात माध्यमांना माहिती दिली. रोमीर सेन म्हणाले, ‘मी त्यांच्या आरोग्याबाबत अधिक काही सांगू शकत नाही. मात्र, इतके नक्की सांगेन की त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. आम्ही नेहमीच राहुल यांच्या सोबत आहोत. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. ते लवकरच या आजारातून बरे होतील, अशी आशा आहे. परंतु, त्यांना तुम्हा सगळ्यांच्या प्रर्थानांची गरज आहे.’

राहुल रॉय यांची प्रकृती पाहता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी का, याबाबत डॉक्टर चर्चा करत आहेत. परंतु, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे घातक ठरू शकते, असे देखील डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळेच डॉक्टर अद्याप कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत (Actor Rahul Roy Health Update).

चित्रीकरणादरम्यान ब्रेनस्ट्रोक

कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना मेंदूघाताचा झटका अर्थात ब्रेनस्ट्रोक आल्याची माहिती समोर आली होती. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह द बॅटल (LAC – Live the Battle) या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्यानंतर राहुल रॉय यांना प्रथम कारगिलहून श्रीनगरला आणि त्यानंतर मुंबई आणण्यात आले.

राहुल रॉय यांनी ‘आशिकी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टी पदार्पण केले होते. नव्वदीच्या दशकात या चित्रपटाने लोकप्रियतेचे नवे मापदंड रचले होते. सध्या राहुल रॉय कारगिलमध्ये LAC – Live the Battle या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. यामध्ये ते एका मेजरची व्यक्तिरेखा साकारत आहेत. नितीन कुमार गुप्ता LAC – Live the Battle या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. तर चित्रा वकील शर्मा आणि निवेदिता बसू या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

(Actor Rahul Roy Health Update)

संबंधित बातम्या : 

Photo : ‘आशिकी’ने आयुष्य बदललं; जाणून घ्या राहुल रॉयचा बॉलिवूड प्रवास!

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.