140 किलोचं शरीर,डायबिटीज; अभिनेता राम कपूरने औषध, सर्जरीशिवाय कमी केलं 55 किलो वजन; डाएटची होतेय प्रचंड चर्चा
प्रसिद्ध अभिनेता राम कपूर यांच्या वेट लॉस जर्नीची प्रचंड चर्चा होतेय. राम कपूर यांचं तब्बल 140 किलो वजन होतं पण त्यांनी असं डाएट फॉलो केल की थेट 55 किलो वजनच कमी केलं आहे. नक्की काय होता डाएट प्लॅन पाहुयात.
आजकाल सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक प्रत्येकाला आपलं डाएट फार महत्त्वाचं आहे. कारण वजन कमी करणं किंवा ते मेंटेन ठेवणं प्रत्येकासाठी आज मोठा टास्क बनला आहे.
आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे सेवन अशा गोष्टींमुळे अनेकांना लठ्ठपणाने ग्रासले आहे. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक लोक मेहनत करतानाही दिसतात. यात अनेकांचा वजन कमी करण्याचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यात आता अजून एका अभिनेत्याचं नाव समाविष्ट होताना दिसतंय ते म्हणजे अभिनेता राम कपूर.
औषध किंवा शस्त्रक्रियेशिवाय 55 किलो वजन कमी केले
अभिनेता राम कपूरने अचानक वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने 18 महिन्यांत 55 किलो वजन कमी केले आहे. पण त्यासाठी त्यांना कोणत्याही औषधाचा किंवा शस्त्रक्रियेचा वापर केला नाही. तर त्यांनी योग्य ते डाएट फॉलो करून आपलं वजन कमी केलं आहे. त्यांचा वजन कमी करण्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय.
राम कपूर यांच्या डाएट अन् वेट लॉसची चर्चा
प्रसिद्ध अभिनेता राम कपूर सध्या सोशल मीडियावर त्याच्या वेट लॉससाठी फारच चर्चेत राम कपूर यांचे वजन हे तब्बल 140 होतं, तसेच त्यांच्या वजनामुळे त्यांना डायबिटीजसह अनेक आजारही झाले होते. मात्र त्यांनी 18 महिन्यांत तब्बल 55 किलो वजन कमी केले आहे.
View this post on Instagram
राम कपूर यांनी वजन कमी करण्याबाबत काही खुलासे केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी कोणत्याही गोळ्यांशिवाय आणि शस्त्रक्रियेशिवाय वजन कसे कमी केले हे सांगितले. वजन कमी करण्यासाठी राम कपूर यांनी आपली जीवनशैली बदलली तसेच व्यायाम आणि संतुलित आहाराच्या मदतीनेच वजन कमी केल्याचे सांगितले.
राम कपूरने वजन कसे कमी केले?
राम कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा किंवा नका, मी जुन्या पद्धतीने वजन कमी केले आहे. वजन कमी करण्यासाठी त्याने प्रथम आपली मानसिकता बदलली आहे, कारण वजन कमी करणे हा देखील एक संकल्प आहे, ज्यामुळे दृष्टीकोन बदलतो.” असं म्हणत त्याने औषधे किंवा सर्जरीशिवाय आपण आपले वजन नियंत्रीत ठेवू शकतो, कमी करू शकतो हे सांगितले आहे.
तसेच राम कपूर यांच्या म्हणण्याप्रमाणे वजन कमी करण्याच्या प्रवासासाठी ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्ण रिसेट होते. त्यामुळे 140 किलो वजन असणारी व्यक्ती देखील अगदी नैसर्गिक पद्धतीने आपले वजन कमी करू शकते हे अभिनेते राम कपूर यांनी दाखवून दिले आहे. फक्त त्यासाठी योग्य आहार आणि योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.
(डिस्क्लेमर: वजन कमी करण्यासाठी स्वत:च्या मनाने उपचार घेणे किंवा डाएट फॉलो करणे टाळा, असे न करता डॉक्टरांचे योग्य ते मार्गदर्शन घ्या.)