‘त्यानं म्हटलं फक्त एकदा स्पर्श कर…’, कास्टिंग काऊचला बळी पडलेल्या रणवीर सिंगने शेअर केला अनुभव!
रणवीर सिंग त्याच्या संघर्षाच्या दिवसात कास्टिंग काऊचचा बळी ठरला होता. एनडीटीव्हीला दिलेल्या जुन्या मुलाखतीत रणवीर सिंगने आपल्यासोबत घडलेल्या या घटनेचा उल्लेख केला होता.
मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्री बर्याचदा कास्टिंग काऊचला बळी पडल्याचे आपण ऐकले आहेत. आजकाल बऱ्याच अभिनेत्री यावर स्पष्ट बोलत आहेत आणि मोठ्या धाडसाने लोकांसमोर आपली चर्चा मांडत आहेत. पण, हे फक्त अभिनेत्रींसोबतच होते असे नाही. यशस्वी बॉलिवूड अभिनेतेही कास्टिंग काऊचला बळी पडले आहेत. अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) देखील कास्टिंग काऊचचा शिकार ठरला होता. त्याने हा किस्सा स्वतःच शेअर केला आणि म्हणाला की, कास्टिंग काऊच हे बॉलिवूडशी संबंधित एक सत्य आहे (Actor Ranveer Singh Share his casting couch incident).
जेव्हा रणवीर कास्टिंग काऊचचा बळी ठरला…
वास्तविक, रणवीर सिंग त्याच्या संघर्षाच्या दिवसात कास्टिंग काऊचचा बळी ठरला होता. एनडीटीव्हीला दिलेल्या जुन्या मुलाखतीत रणवीर सिंगने आपल्यासोबत घडलेल्या या घटनेचा उल्लेख केला होता. तो म्हणाला की, मला मिटिंगपूर्वीच त्यांनी असे सांगितले होते की, आपण एक सद्गृहस्थाला भेटणार आहोत. रणवीर म्हणाला की, त्या व्यक्तीने माझा पोर्टफोलिओ एकदाही पहिला नाही.
पोर्टफोलिओ केला नजरअंदाज
रणवीर सिंग म्हणाला, ‘मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. म्हणून मला माहित आहे की 500 पृष्ठांचे पोर्टफोलिओ कोणीही पाहणार नाही. म्हणून, मी एक अतिशय प्रभावी पोर्टफोलिओ डिझाईन केला होता. जो कोणी एकदा तरी पाहीलच… परंतु, त्यांने एक नजरही टाकली नाही.'(Actor Ranveer Singh Share his casting couch incident)
रणवीरला म्हणाला….
रणवीर सिंह पुढे म्हणाला की, ‘शोबिजच्या जगात पुढे जाण्यासाठी स्मार्ट आणि मादक असणे आवश्यक आहे असे तो व्यक्ती मला म्हणाला. या संभाषणादरम्यान त्या व्यक्तीने रणवीरला पुढे येण्यास सांगितले आणि एकदा त्याला स्पर्श करण्यास सांगितले. मात्र, रणवीरने त्याला स्पष्टपणे नकार दिला. तो व्यक्ती त्याच्यावर दबाव टाकत राहिला आणि जेव्हा रणवीर त्याला नकार देत राहिला. तेव्हा तो रागावला. एखाद्या प्रेमवीराचे हृदय तुटल्यासारखा तो रागावला होता.’
मीच नाही, इतर बर्याच लोकांसोबतही घडले…
रणवीर सिंह म्हणाला की, या घटनेनंतर त्याने ही गोष्ट बऱ्याच नव्या कलाकारांच्या लक्षात आणून दिली आणि आपला अनुभव सांगितला, त्यावर त्यांनी देखील रणवीरप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली. यासोबतच त्याने रणवीरला सांगितले की, त्या व्यक्तीशी त्यांचीही भेट अशीच काहीशी झाली आहे आणि ते देखील कास्टिंग काऊचला बळी पडले होते.
(Actor Ranveer Singh Share his casting couch incident)
हेही वाचा :
बॉलिवूडकरांनो आता मालदीव व्हेकेशन ट्रीप विसरा, भारतीयांसाठी मालदीवचे दरवाजे बंद! जाणून घ्या कारण…
Anupam Kher | ‘येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर https://t.co/bJwCrGTJzZ #AnupamKher | #PMNarendraModi
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 26, 2021