सैफ अली खानच्या हत्येचाच हेतू होता का? बॉलिवूडच्या व्हिलनला संशय; म्हणाले, ही तर लज्जास्पद…
सैफ अली खानवरील हल्ला हा चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींसाठीही एक मोठा धक्का आहे. अनेका सेलिब्रिटींनी याबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्याबाबत बॉलिवूड अभिनेते रजा मुराद यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. रजा मुराद यांनी या हल्ल्याचा निषेध करत ही घटना अतिशय लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच हा हल्ला नक्की चोरीच्या हेतूने केला की जीवे मारण्याच्या हेतूने असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटनेनं सर्वांचीच झोप उडवली. अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून. सैफवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे . पोलिसांकडून चाहत्यांना शांतता ठेवण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
सैफवरील हल्ला सेलिब्रिटींसाठीही धक्का
सैफ अली खानवरील हल्ला हा चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींसाठीही एक मोठा धक्का आहे. अनेका सेलिब्रिटींनी याबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असल्याचंही म्हटलं जात आहे. या हल्ल्याबाबत बॉलिवूड अभिनेते रजा मुराद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रजा मुराद यांनी या हल्ल्याचा निषेध करत ही घटना अतिशय लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं.
अभिनेते रजा मुराद यांची सैफच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया
रजा मुराद यांनी म्हटलं आहे की, “अशा घटना कधीच होऊ नये. आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असेल, किंवा आपल्या स्वत:च्या जीवाला धोका होईल अशा घटना घडता कामा नये. या समस्येचं समाधान निघालं पाहिजे.” असं म्हणत त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
“चोरीच्या आड जीव घेण्याचा हेतू होता का?”
रजा मुराद पुढे म्हणाले “सैफ तरुण आहेत. तो या जीवघेण्या हल्ल्यातून वाचला. दुसरा कोणी असता तर वाचला नसता. त्यामुळे ही फक्त चोरी होती की चोरीच्या आड जीव घेण्याचा हेतू होता का? सैफची हत्या करण्यासाठी चोर घुसला होता का? हा व्यक्ती नेमका घरात घुसला कसा? कोणत्या प्रकारे दाखल झाला?” असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.
“प्रत्येक घरात ग्रील्स लावलेल्या असतात. लहान मुलं घरात असतात म्हणून ग्रील्स लावले जातात. प्रत्येक घराच्या दरवाज्याला अनेक लॉक्स असतात. सीसीटीव्ही असतं. त्यामुळे प्रश्न हा आहे की, एवढी मोठी घटना घडलीच कशी? एवढी भयानक घटना घडली आणि ही घटना एवढी सहज कशी घडली? ही चिंतेची बाब असून लज्जास्पद गोष्ट आहे. या घटनेच्या मूळाशी गेलं पाहिजे.” असही ते म्हणाले आहेत.
“सेलिब्रिटींना खंडणी मागितली जाते, धमक्या दिल्या जातात”
“अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असतात. पण त्या समोर येत नाही. तुम्हाला खंडणी मागितली जाते. तेव्हा तुम्ही देता. भांडण नको म्हणून तुम्ही पैसै देऊन टाकतात. भीतीच्या वातावरणात राहू नये म्हणून देतात. अनेक वर्षापासून हे होत आलं आहे. काही गोष्टी पोलिसांपर्यंत जात नाही. पण जिथे गोळीबार होतो किंवा घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न होतो तेव्हा या गोष्टी बाहेर येतात. त्यामुळे अशा घटनेच्या मूळाशी गेलं पाहिजे. आणि आरोपींना कठोर शिक्षा केली पाहिजे.” असं म्हणत रजा मुराद यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.