गायिका कनिका कपूरवर गुन्हा दाखल, ऋषी कपूर म्हणतात…
गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ (Rishi Kapoor tweet on kanika kapoor) उडाली आहे. नकुतेच ती लंडनवरुन आली होती.
मुंबई : गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ (Rishi Kapoor tweet on kanika kapoor) उडाली आहे. नकुतेच ती लंडनवरुन आली होती. त्यानंतर ती कानपूर आणि लखनऊमधील पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीत तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी “कपूरांची वेळ खराब आहे”, असं ट्वीट केलं (Rishi Kapoor tweet on kanika kapoor) आहे.
ऋषी कपूर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये गायिका कनिका कपूर आणि येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर याचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, “आजकाल काही कपूर लोकांची खराब वेळ सुरु आहे. दुसऱ्या कपुरांची रक्षा करा, कोणतेही वाईट काम होऊ नये, जय माता दी.”
Aaj kal kuch “Kapoor”logon pe time bhaari hai. Darta hoon. Hey Malik raksha karna doosre “Kapoor-on”ki! Koi galat kaam na ho kabhi. Jai Mata Di! pic.twitter.com/gPyHJvGGaY
— Rishi Kapoor (@chintskap) March 20, 2020
कनिकाला सध्या लखनऊच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु असून डॉक्टरांच्या निगराणीखाली तिला ठेवण्यात आले आहे.
देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या (22 मार्च) जनता कर्फ्यू घोषित केला आहे.
दरम्यान, कनिकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यासोबत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही क्वारंटाईन करण्यात आले होते. पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.