Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला, देवरा को-स्टारला धक्का, ज्युनिअर एनटीआर म्हणाला..
बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्यांपैकी एक असलेला सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. काल मध्यरात्री त्याच्या घरात घुसलेल्या एका चोराने सैपवर चाकून 6 वार केले, ज्यामध्ये तो बराच जखमी झाला. त्याच्यावरील हल्ल्याच्या वृत्ताने अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला असून तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना अनेकांनी केली आहे.
बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्यांपैकी एक असलेला सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. काल मध्यरात्री त्याच्या घरात घुसलेल्या एका चोराने सैपवर चाकून 6 वार केले, ज्यामध्ये तो बराच जखमी झाला. हल्लेखोर हा चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता की त्याचा दुसरा काही हेतु होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, पण तो हलेल्खोर रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्लेखोराचा रात्री 2 वाजता सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सूरु असल्याचा आवाज सैफअली खानला आला. आवाज ऐकून तो बाहेर आला आणि हल्ल्याचा हा प्रकार घडला. यामध्ये सैफच्या घरातील मोलकरीणही जखमी असून तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सैफवर सध्या लीलावतीमध्ये सर्जरी सुरू असून त्याच्या प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान या चोराला इमारतीमध्ये प्रवेश कसा मिळाला, आरोपीने इमारतीत गेटवरून प्रवेश केला की भिंतीवरून उडी मारून तो आता, सैफच्या घरात तो कधी आणि नेमका कसा घुसला या सर्व प्रश्नांची उत्तरं सध्या पोलीस शोधत आहेत. सैफच्या घरातील मोलकरीण आणि त्या हल्लेखोराचा वाद का झाला, त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचाही पोलीसांकडून सध्या तपास सुरू असून या प्रकरणाच्या तपासासाठी एकून 7 पथके गठीत करण्यात आली आहेत. एक टीम तपासासाठी मुंबईबाहेरही पाठवण्यात आली आहे. सैफच्या घरातील काही जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्यांचे मोबाईलही जप्ता करण्यात आले आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटींना धक्का
दरम्यान सैफवरील हल्ल्याची बातमी आज सकाळी समोर येताच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. सैफ अली खानच्या देवरा या चित्रपटातील सहकलाकार, अभिनेता ज्युनियर एनटीआरलाही बराच धक्का बसला आहे. त्याने X या सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवर एक पोस्ट लिहीली आहे. हल्ल्याची ही बातमी ऐकून आपण स्तब्ध झाल्याचे त्याने नमूद केले. ‘ सैफ सरांवरील हल्ल्याबद्दल ऐकून मला धक्का बसला आहे, मी दु:खी आहे . त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो’असं त्याने ट्विटमध्ये नमूद केलं.
Shocked and saddened to hear about the attack on Saif sir.
Wishing and praying for his speedy recovery and good health.
— Jr NTR (@tarak9999) January 16, 2025
तसेच इतर काही सेलिब्रिटींनीही सैफच्या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ही अराजकता थांबवता येईल का ? असे विचारत पूजा भट्टने MumbaiPolice ना टॅग केलं आहे. आम्हाला वांद्र्यात अधिक पोलिसांची गरज आहे, असे तिने नमूद केलं.
Can this lawlessness please be curbed @MumbaiPolice @CPMumbaiPolice We need more Police presence in Bandra. The city & especially the queen of the subburbs, have never felt so unsafe before. 🙏 Kind Attn @ShelarAshish @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis 🙏🙏🙏 https://t.co/6PJm65a8Df
— Pooja Bhatt (@PoojaB1972) January 16, 2025
“धक्कादायक आणि भीतीदायक घटना. सैफ लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करतो, असे चित्रपट दिग्दर्शक कुणाल कोहलीने X वर लिहिले.
Shocked and saddened to hear about the attack on Saif sir.
Wishing and praying for his speedy recovery and good health.
— Jr NTR (@tarak9999) January 16, 2025
Deeply Disturbed by news of the attack by an intruder on #SaifAliKhan
Wishing and praying for his speedy recovery.
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 16, 2025
सैफ अली खानच्या टीमने एक निवेदन जारी केले असून त्यानुसार सैफवर हल्ला करण्यात आला आणि अभिनेता हिरोप्रमाणे धैर्याने लढला. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे. त्याचे घर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. करीना कपूर आणि तिची मुले सुरक्षित आहेत. मुंबई पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली, त्यानंतर अधिकृत निवेदन जारी करण्यात आले.