Salman Khan : सतत धमक्या, सलमानचा जीव धोक्यात.. भाईला कसं सुरक्षित ठेवतो शेरा ? जुना व्हिडीओ व्हायरल

Salman Khan Bodyguard Shera : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी तो नेहमीच दक्ष असतो.त्याचा एक इंटरव्ह्यू पुन्हा व्हायरल होत असून सलमानच्या सुरक्षेदरम्यान आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान काय असतं, ते तो सांगताना दिसला.

Salman Khan :  सतत धमक्या, सलमानचा जीव धोक्यात.. भाईला कसं सुरक्षित ठेवतो शेरा ?  जुना व्हिडीओ व्हायरल
सलमान खान आणि शेराImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 3:45 PM

अभिनेता सलमान खान नेहमी चर्चेत असतो पण सध्या तो चित्रपटांमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एप्रिल महिन्यात त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याला अनेकवेळा धमकी मिळाली, त्याचे वडील सलमान खाना यांनाही धमकी मिळाली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने सलमाना अनेकवेळा धमकी दिली आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीनेच या हत्येची जबाबदारी स्वीकारली. या हत्येची जबाबदारी स्वीकारताना टोळीतील एका सदस्याने अभिनेता सलमान खानचा उल्लेख केल्यामुळे आता सलमानच्या सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे

सलमानला कारतर्फे सुरक्षा असली तरी त्याची सुरक्षा व्यवस्थाही एकदम कडेकोट असते. शेरा उर्फ गुरमीत सिंह जॉली हा सलमान खानचा प्रमुख बॉडीगार्ड असून 25 वर्षांपेक्षा अधिक काळ तो सलमान सोबत काम करतोय. बिश्नोई टोळीकडून आलेल्या धमक्यांमुळे सलमान खान भीतीच्या सावटाखाली आहे. त्याचदरम्यान आता शेरा याचा एका जुना इंटरव्ह्यू व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी एएनआय या वृत्तसंस्थेने शेराची मुलाखत घेत सलमानच्या सुरक्षेबंधित प्रश्न विचारले होते. सलमानच्या सुरक्षेवेळी काया आव्हान असतात, त्याची काळजी तो कसा घेता, अशा अनेक प्रश्नांची शेराने दिलखुलासपणे उत्तर दिली.

कशी झाली सलमानशी पहिली भेट ?

‘ सलमान खानला मी  मालक म्हणतो. तो प्रत्येकवेळी माझ्यासाठी उभा राहतो. सलमानची बहीण अर्पितामुळे माझी भाईशी पहिली भेट झाली. त्यानंतर मी सोहेन खानला भेटलो होतो. सोहेल भाईने एका स्टेज शो दरम्यान माझी सलमान भाईशी ओळख करून दिली होती.चंदीगडमधील त्यांच्या कार्यक्रमादरम्यान काही अडचणी आल्या होत्या, त्यानंतर मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम केलं, हे नातं अजूनही कायम आहे’ असं शेराने सांगितलं.

काय असतं आव्हान ?

‘ सलमान खानच्या जीवाला धोका आहे, ज्या स्टार्सच्या जीवाला धोका असतो त्यांना गर्दीत जाण कठीण असतं. सलमान खानची सुरक्षा व्यवस्था पाहताना सर्वात मोठं आव्हान असतं ते गर्दीचं, लहान मोठे सगळ्यांनाचा त्याला भेटायचं असतं, हात मिळवायचा असतो, फोटो काढायचे असतात. सलमान भाई जेव्हा गर्दीत जातो, तेव्हा त्याचं रक्षण करणं हेचं माझं काम असतं आणि इतर सुरक्षा रक्षक हे तिथली गर्दी हाताळतात. आधी अशी परिस्थिती नव्हती . पूर्वी त्याच्या जीवाला धोका नव्हता. त्यामुळे तेव्हा त्याची सुरक्षा व्यवस्था बघणं हे एवढं अवघड नव्हतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं’, असं शेरा म्हणाला.

शेराचं खरे नाव गुरमीत सिंह जॉली आहे. तो बॉलिवूडमध्ये ‘शेरा’ या नावाने ओळखला जातो. 1995 पासून शेराने सलमान सोबत काम करायला सुरूवात केली. तसेच त्याची टायगर सिक्युरिटी नावाची फर्म आहे, जी इतर कलाकारांना सुरक्षा पुरवण्याचे काम करते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.