शाहरुख खान याच्या मुलाची शाळेची फी किती? फी कार्ड तुफान व्हायरल

शाहरूख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुखने तगडी कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, लाखो चाहत्यांच्या हृदयात वसलेल्या शाहरूखचे नेटवर्थ 5000 कोटी रुपये आहे. 1991 साली शाहरुखने त्याची गर्लफ्रेंडन गौरी खानशी लग्नं केलं.

शाहरुख खान याच्या मुलाची शाळेची फी किती? फी कार्ड तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 11:00 AM

शाहरूख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुखने तगडी कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, लाखो चाहत्यांच्या हृदयात वसलेल्या शाहरूखचे नेटवर्थ 5000 कोटी रुपये आहे. 1991 साली शाहरुखने त्याची गर्लफ्रेंडन गौरी खानशी लग्नं केलं. 1997 मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचा आर्यनचा तर 2000 साली त्यांची लाडकी लेक सुहानाचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर तब्बल 13 वर्षांनी शाहरुख खान आणि गौरी पुन्हा आई-वडील बनले. तिसऱ्यांदा सरोगसीद्वारे जन्मलेल्या अबरामचे त्यांनी खान कुटुंबात जल्लोषात स्वागत केले.

मुलासाठी तगडी फी भरतो शाहरुख खान

अनेक उद्योगपती, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी यांच्याप्रमाणे शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम हासुद्धा भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये शिकतो. अबराम हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी आहे. आत्तापर्यंत त्याने शाळेच्या विविध स्पर्धांमध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला. त्यांच्या शाळेच्या ॲन्युअल फंक्शनमधील अबरामने सहभाग घेतल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी किड्सही या शाळेत शिकतात. मात्र स्टार किड्सच्या या शाळेची फी ऐकून तर लोकांचे डोळेच विस्फारतील.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

किती आहे धीरूभाई अंबानी स्कूलची फी ?

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी प्रत्येक इयत्तेनुसार बदलते. रिपोर्ट्सनुसार, एलकेजी ते इयत्ता 7 वी पर्यंतचे मासिक शुल्क सुमारे 1.70 लाख रुपये आहे. आणि 8 वी ते 10 वी पर्यंतची दर महिन्याची फी ही 4.48 लाख रुपये आहे. तर 11वी आणि 12वी फी सुमारे 9.65 लाख रुपये आहे. शाळेच्या फी रचनेनुसार, अब्रामची वार्षिक फी सुमारे 20.40 लाख रुपये आहे.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची भारतातील सर्वोच्च शाळांमधील एक अशी गणना केली जाते. 2003 साली मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी स्थापन केली होती. तेव्हापासून ते आयबी वर्ल्ड स्कूल आहे. 1,30,000 चौरस फुटांवर पसरलेल्या या शाळेत आधुनिक सुविधा आणि सर्वांगीण शिक्षण सुविधा आहेत. शाळेची इमारत ७ मजली आहे ज्यामध्ये अनेक वर्ग, सुंदर खेळाचे मैदान, इंटरनेट सुविधा, टेरेस गार्डन, छतावरील बाग, टेनिस कोर्टही आहे, असे समजते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.