मनोरंजन विश्वात चमकण्यासाठी बदललं नाव, अवघ्या 25 रुपयांत सुनील दत्तंनी केली करिअरची सुरुवात!

बॉलिवूड अभिनेता सुनील दत्त (Sunil Dutt) यांनी एकापेक्षा एक अविस्मरणीय चित्रपटात काम करून चाहत्यांचे मनोरंजन केले होते. आजही सुनील दत्त या जगात नाहीत, तरीही त्यांच्या अभिनयाची जादू त्यांच्या चाहत्यांवर कायम आहे.

मनोरंजन विश्वात चमकण्यासाठी बदललं नाव, अवघ्या 25 रुपयांत सुनील दत्तंनी केली करिअरची सुरुवात!
सुनील दत्त
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 8:12 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील दत्त (Sunil Dutt) यांनी एकापेक्षा एक अविस्मरणीय चित्रपटात काम करून चाहत्यांचे मनोरंजन केले होते. आजही सुनील दत्त या जगात नाहीत, तरीही त्यांच्या अभिनयाची जादू त्यांच्या चाहत्यांवर कायम आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र, आपली कारकीर्द बहरण्यासाठी त्यांना भरपूर संघर्ष करावा लागला होता (Actor Sunil dutt started his film career in 25 rupees only know about his struggle).

सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज रघुनाथ दत्त असे होते. मनोरंजन विश्वात येण्यासाठी अभिनेत्याने आपले नावच बदलले. सुनील यांनी चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनयातून जवळपास चार दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सुनील दत्तचा जन्म पाकिस्तानामधील पंजाबमध्ये झाला होता. फाळणीच्या वेळी त्याचे कुटुंब भारतात स्थायिक झाले.

बसमध्ये केली होती नोकरी

सुनील दत्त केवळ 5 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत जेव्हा ते मुंबई येथे शिकण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती ज्यामुळे त्यांना बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करावे लागले.

रेडीओने करिअर बदलले

सुनील दत्त यांचा आवाज खूप मजबूत होता. अशा परिस्थितीत कॉलेजच्या दिवसांत त्यांनी थिएटर करणे सुरू केले. एकदा रेडिओचे प्रोग्रामिंग हेड सुनीलचे नाटक पाहण्यासाठी आले. तेव्हा त्यांना सुनील दत्त यांचा आवाज खूप आवडला, तेव्हा त्यांनी सुनील दत्त यांना आरजेची नोकरी ऑफर केली. अशा परिस्थितीत सुनील यांनी अजिबात वेळ न दवडता लगेच होकार दिला. या कामासाठी अभिनेत्याला 25 रुपये फी दिली गेली. रेडिओमध्ये काम करत असताना त्यांनी पत्नी नर्गिस यांचीही एकदा मुलाखत घेतली होती (Actor Sunil dutt started his film career in 25 rupees only know about his struggle).

बॉलिवूडमध्ये पदार्पण

सुनील दत्तने यांनी 1955 मध्ये ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटाद्वारे आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात केली होती. पण अभिनेत्याला त्याची खरी ओळख ‘मदर इंडिया’मधून मिळाली. यानंतर, 1963मध्ये त्यांनी ‘मुझे जिने दो’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात ते पहिल्यांदाच एका डाकूच्या भूमिकेत दिसले होते, ज्यासाठी त्यांचे खूप कौतुक झाले होते.

राजकीय भूमिका

नर्गिस दत्त यांच्या निधनानंतर सुनील दत्त मानाने पूर्णपणे तुटले होते आणि त्यानंतर काही दिवसांनी ते राजकारणात आले. 2004 ते 2005 या कालावधीत ते क्रीडा व युवा कार्यमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री झाले. 1968 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वाढदिवसाच्या काही दिवस आधीच घेतला शेवटचा श्वास!

25 मे 2005 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने सुनील दत्त यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यूच्या अवघ्या 12 दिवसांचा अर्थात 6 जूनला त्यांचा 76 वा वाढदिवस होता. सुनील शेवटच्या वेळी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये दिसले होते.

(Actor Sunil dutt started his film career in 25 rupees only know about his struggle)

हेही वाचा :

Photo: माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूची मुलगी राबिया नवी इंटरनेट सेन्सेशन; फोटो पाहाच

Arrest Yuvika Choudhary | अटकेच्या भीतीने घाबरली युविका चौधरी, सोशल मीडियावर पोस्ट लिहित मागितली माफी!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.