Sushant Singh Rajput | आपल्या एकीतच बळ आहे आणि ते असेच राहू द्या, सुशांतच्या बहिणीचे चाहत्यांना भावनिक आवाहन!
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची बहीण श्वेतासिंह कीर्ती ही सतत सुशांतला न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Actor Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर त्याची बहीण श्वेतासिंह कीर्ती ही सतत सुशांतला न्याय मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या कित्येक दिवसात तिने अनेक डिजिटल मोहिमा राबविल्या, ज्याला लोकांचा पाठिंबाही मिळाला आहे. श्वेताने सुशांतच्या चाहत्यांचे नाव ‘एसएसआर वॉरियर्स’ असे ठेवले आहे. याशिवाय तिने ‘#SSRWarriors’ ट्रेंड केला आहे, जो वापरून चाहते सुशांतसाठी सतत न्यायाची मागणी करत आहेत. आता पुन्हा एकदा कीर्तीने सुशांतच्या चाहत्यांना भावनिक आवाहन केले आहे. (Actor Sushant Singh Rajput sister Shweta singh kirti tweet for ssr warriors appeals to be united)
या भावनिक आवाहनात तिने सुशांतच्या चाहत्यांना एकजुटीने राहण्याचे आवाहन केले आहे. ‘आपल्या एकीत बळ आहे आणि ते पुढेही तसेच राहू द्या’, अशा आशयाचे ट्विट केले आहे. या आधी तिने तिचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.
Our strength lies in our unity and we will never let it break!! ??#SSRWarriorsStayUnited
— Shweta Singh Kirti (@shwetasinghkirt) October 19, 2020
सुशांतची हत्या नसून आत्महत्याच, एम्सचा दावा
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता.(Actor Sushant Singh Rajput sister Shweta singh kirti tweet for ssr warriors appeals to be united)
नव्या फॉरेन्सिक पथकाची नेमणूक करण्यात यावी : विकास सिंह
एम्सच्या अहवालानंतर सुशांतचे वकील विकास सिंह यांनी ट्विट करत, ‘एम्सचे पथक प्रत्यक्षात शरीर न पाहता असा निर्णायक अहवाल कसा देऊ शकते?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे. विकास सिंह (Vikas Singh) यांनी ट्विट केले होते की, ‘एम्स पथकाने सीबीआयला सादर केलेल्या अहवालामुळे (AIIMS report) मी अस्वस्थ आहे. मी सीबीआय संचालकांना नवीन फॉरेन्सिक टीम स्थापन करण्यासाठी विनंती करणार आहे.’
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ‘एम्सची टीम मृतदेह न पाहता असा निर्णायक अहवाल कसा तयार करू शकते? तेही मुंबईतील कूपर रूग्णालयाच्या अशा पोस्टमॉर्ट अहवालावर, ज्यात मृत्यूची वेळही दिली गेली नाही.’
आत्महत्येच्या दिशेने तपास सुरू होणार?
एम्सचा अहवाल मिळाल्यानंतर आता सीबीआय आत्महत्येचा मुद्दा लक्षात घेऊन या प्रकरणाची चौकशी करणार आहे. म्हणजेच पुढील तपासात, सुशांतने (Sushant Singh Rajput) आत्महत्या केली असेल तर त्याचे कारण काय होते? त्याला कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले? त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय?, या प्रश्नांची उत्तरे शोधली जाणार आहेत. या प्रकरणी सुशांतचा लॅपटॉप, हार्ड डिस्क, कॅनन कॅमेरा आणि दोन मोबाईल सीबीआयने ताब्यात घेतले आहेत.
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput | सीबीआयवरही विश्वास नाही का?, संजय राऊतांचा सुशांतच्या वकिलांना टोला
(Actor Sushant Singh Rajput sister Shweta singh kirti tweet for ssr warriors appeals to be united)