SSR Drugs Case | रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी, ड्रग्ज प्रकरणात एनसीबी आरोपपत्र दाखल करणार!

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज रॅकेट (Sushant Singh Rajput Drugs Case) प्रकरणाचा तपास करणारे नारकोटिक्स ब्युरो (NCB) आज (५ मार्च) या प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल करणार आहे.

SSR Drugs Case | रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी, ड्रग्ज प्रकरणात एनसीबी आरोपपत्र दाखल करणार!
या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती हिला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे.
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 11:29 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज रॅकेट (Sushant Singh Rajput Drugs Case) प्रकरणाचा तपास करणारे नारकोटिक्स ब्युरो (NCB) आज (५ मार्च) या प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल करणार आहे. या प्रकरणात सुशांतला ड्रग्ज पुरवणारे बॉलिवूडमधील लोक आणि त्यांचे इतर कनेक्शन तपासले जात आहे. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला मुख्य आरोपी बनवण्यात आले असून, अन्य 32 जणांनाही आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे (Actor Sushant Singh Rajput Suicide case drug connection NCB files first charge sheet).

प्राप्त माहितीनुसार, ही चार्जशीट 12000 पानांची असून, रियासह एकूण 33 जणांवर यात आरोप केले गेले आहेत. आरोपपत्रात मुख्य आरोपी म्हणून रिया चक्रवर्ती हिच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. तर, इतर आरोपी म्हणून रियाचे निकटचे सहकारी आणि अनेक ड्रग पेडलर्स, ड्रग पुरवठा करणाऱ्यांची नावेही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. ही चार्जशीट मोबाईल फोन आणि संगणक या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर आणि साक्षीदारांच्या निवेदनांच्या आधारे तयार केली गेली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावेही समोर येण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबी आरोपपत्र दाखल करणार!

सारा आली खान आणि श्रद्धा कपूरही अडकणार?

या प्रकरणी तपास करणारे मुख्य अधिकारी आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे स्वतः आरोपपत्र घेऊन शुक्रवारी न्यायालयात हजर होणार आहेत. एनसीबी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुख्य आरोपपत्राच्या तीन महिन्यांनंतर एनसीबी न्यायालयात पूरक आरोपपत्रही सादर करू शकते. पूरक आरोपपत्रात सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावेही असू शकतात. त्यांच्याविरूद्ध एनसीबीला अनेक पुरावे सापडले होते, ज्यासाठी अद्याप चौकशी सुरु आहे (Actor Sushant Singh Rajput Suicide case drug connection NCB files first charge sheet).

ड्रग्जच्या नशेत सापडला हृषिकेश पवार!

अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीत एनसीबीने त्याची जवळची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती तसेच ऋषिकेश पवार नावाच्या व्यक्तीलाही या प्रकरणात जबाबदार मानले आहे. ऋषिकेश सुशांतच्या कंपनीत असिस्टंट डायरेक्टर पदावर काम करायचा. ऋषिकेशनेच सुशांत सिंह राजपूतला ड्रग्जची सवय लावली होती, अशी माहिती एनसीबीला तपासादरम्यान मिळाली आहे. ऋषिकेश, सुशांत सिंह राजपूतला गांजा आणि चरस पुरवायचा. लॉकडाऊन दरम्यान सुशांतच्या घरी काम करणारा दीपेश सावंत हा ऋषिकेशकडूनच गांजा विकत घेत होता. एनसीबीला ऋषिकेशच्या लॅपटॉपमधून अनेक प्रकारच्या ड्रग्जची छायाचित्रे मिळाली आहेत.

(Actor Sushant Singh Rajput Suicide case drug connection NCB files first charge sheet)

हेही वाचा :

Income Tax Raid | ‘हे तर छोटे प्लेयर…’, इन्कमटॅक्स धाडीनंतर कंगनाचा अनुराग-तापसीवर हल्लाबोल!

‘The Kapil Sharma Show’ टीव्हीवर नाही, तर ‘इथे’ पाहता येणार! पाहा कीकू शारदा काय म्हणाला…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.