Aishwarya Rai Birthday : काम कमी पण रग्गड कमाई ! ऐश्वर्या रायची संपत्ती किती ? पती अभिषेक बच्चनपेक्षा…

Aishwarya Rai Birthday : बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ऐश्वर्या रायचं अभिनयाचं नाणंही तितकंच खणखणीत वाजतं. सध्या ती चित्रपटसृष्टीत कमी ॲक्टिव्ह असली तरी ती दरवर्षी रग्गड कमाई करते. ऐश्वर्या रायची संपत्ती नेमकी किती आहे?, ती इतकी कमाई कुठून करते ?

Aishwarya Rai Birthday : काम कमी पण रग्गड कमाई ! ऐश्वर्या रायची संपत्ती किती ? पती अभिषेक बच्चनपेक्षा...
Aishwarya Rai
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 9:25 AM

बॉलिवूडमध्ये सुंदर अभिनेत्री काही कमी नाहीत, पण अनोखं सौंदर्य म्हणून ओळखली जाणारी, प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्नर्या राय बच्चन. आज 1 नोव्हेंबर, ऐश्वर्या आज तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1997 साली और प्यार हो गया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु करणारी ऐश्वर्या अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेत्री ठरली. अनेक चित्रपटातून तिच्या सौंदर्यामुळे रसकि प्रेक्षक घायाळ झाले पण ती फक्त सुंदरच नव्हे तर तिच्या अभिनयाचं नाणंही खणखणीत वाजलंय. 27 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या ऐश्वर्याने शेकडो चित्रपटातंही काम केलं असून तिचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते आहेत. एवढेच नव्हे तर तिने रग्गड कमाईदेखील केली आहे. सध्या काही वर्षांपासून ऐश्वर्या राय चित्रपटांत फारशी दिसत नाही. सध्या ती कमी ॲक्टिव्ह असली तरीही ती दरवर्षी कोट्यवधी रुपये कमावते.

श्रीमंतीच्या बाबतीत ऐश्वर्या राय अनेक बड्या स्टार्सना मागे टाकते. ती बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकंच नाही तर तिची संपत्ती ही पती अभिषेक बच्चनपेक्षाही जास्त आहे. बॉलिवूड लाईफनुसार ऐश्वर्या रायची संपत्ती 800 कोटी रुपये आहे. तर अभिषेकचे नेटवर्थ हे 280 कोटी असल्याचे वृत्त आहे.

चित्रपटासाठी आकारते कोट्यवधी

हे सुद्धा वाचा

CNBC TV18 च्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय तिच्या चित्रपटांसाठी मोठी रक्कम आकारते. ती एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते. एवढेच नव्हे तर ऐश्वर्या राय अनेक ब्रँडचा चेहरा आहे. त्यामुळे ती ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करते. एका दिवसासाठी ती सुमारे 6 ते 7 कोटी रुपये फी घेते.

अनेक ठिकाणी गुंतवणूक

ऐश्वर्या रायने अनेक कंपन्यांमध्यदेखील गुंतवणूक केली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये तिने नरिशमेंट सर्विहस कंपनीमध्ये सुमारे 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. यापूर्वी, तिे बेंगळुरूमधील पर्यावरण स्टार्टअपमध्ये 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत

गेल्या काही काळापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनमधील तणावाच्या चर्चा समोर येत आहेत. ती सध्या बच्चन कुटुंबासोबत न राहता मुलगी आराध्या आणि आईसोबत वेगळी रहात असल्याचेही वृत्त आहे. अंबानी कुटुंबाच्या लग्नसोहळ्यात अभिषेकने संपूर्ण बच्चन कुटुंबासोबत एंट्री केली. मात्र ऐश्वर्या-आराध्या त्यांच्यासोबत न येता वेगळ्या आल्या होत्या. याची बरीच चर्चा झाली होती.

Actress Aishwarya Rai and aaradhya bachchan (3)

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.