पूनम पांडे प्रचंड ट्रोल, थेट लोकांनी काढली लाज, जेलमध्ये टाकण्याची मागणी

| Updated on: Feb 03, 2024 | 2:24 PM

पूनम पांडे ही सध्या तूफान चर्चेत आहे. पूनम पांडे हिचे निधन झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर तिच्याच अकाऊंटवरून शेअर करण्यात आली. यानंतर लोक हैराण झाले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लोक पूनम पांडे हिच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत होते. यानंतर आता व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

पूनम पांडे प्रचंड ट्रोल, थेट लोकांनी काढली लाज, जेलमध्ये टाकण्याची मागणी
Follow us on

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन झाल्याची पोस्ट व्हायरल होताच सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर लोकांनी पूनम पांडे हिच्या अंत्यदर्शनासाठी तिच्या मुंबईतील घराकडे धाव घेतली. पूनम पांडे हिच्यावर कानपूरमध्ये अत्यंसंस्कार होणार असल्याचे सांगितले गेले. पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे तिच्या मॅनेजरकडून सांगितले गेले. हेच नाही तर पूनम पांडे हिच्या निधनानंतर बाॅलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले. पूनम पांडे हिने वयाच्या 32 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतल्याचे सांगितले जात होते.

शेवटी पूनम पांडे हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सर्वांनाच धक्का दिला. या व्डिडीओमधून पूनम पांडे हिने स्पष्ट सांगितले की, ती जिवंत आहे. हेच नाही तर या व्हिडीओमध्ये लोकांची माफी मागताना देखील पूनम पांडे ही दिसत आहे. पूनम पांडे हिच्या व्हिडीओनंतर लोक तिचा चांगलाच समाचार घेताना दिसत आहेत. लोक सतत कमेंट करत आहेत.

एकाने पोस्ट शेअर करत लिहिले की, मी खरोखरच खूप जास्त आनंदी आहे की, तू जिवंत आहे, परंतू असा स्टंट करणे बंद कर. दुसऱ्याने लिहिले की, आजपर्यंतचा सर्वात जास्त वाईट पब्लिसिटी स्टंट हा आहे. तिसऱ्याने लिहिले की, शर्मनाक, असा पब्लिसिटी स्टंट करणे म्हणजे मुर्खपणाचे लक्षण आहे, लाज वाटायला हवी, हिच्यावर कारवाई झालीच पाहिजे.

अजून एकाने लिहिले की, हा प्रकार कुठेतरी रोखणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अशा लोकांच्या यानंतरही हिंमत वाढतील, जे समाजासाठी अत्यंत घातक आहे. पूनम पांडे हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ही सातत्याने केली जात आहे. हेच नाही तर लोकांनी कमेंट करत पूनम पांडे हिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

गुरूवारी रात्री पूनम पांडे हिचे निधन झाल्याचे सांगितले गेले. हेच नाही तर गर्भाशयातील कॅन्सरमुळे पूनम पांडे हिचे निधन झाले. मात्र, पूनम पांडे हिने आपल्या स्वत:च्याच लग्नाचा स्टंट केला. पूनम पांडे हिला या प्रकरणानंतर थेट जेलमध्ये जाण्याची देखील वेळ येऊ शकते. आता पूनम पांडे हिच्या अडचणीमध्ये वाढ होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.