संताप…संताप ! रोल हवा असेल तर माझ्यासोबत…. निर्मात्याची अभिनेत्रीकडे धक्कादायक मागणी
एका साऊथ चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास गेलेल्या अभिनेत्रीला कॉम्प्रोमाईज करण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिले होते.
Ankita Lokhande Casting Couch : बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) चित्रपटसृष्टीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. तो अनेक वर्षांपासून मनोरंजन उद्योगाचा एक भाग आहे. या दरम्यान, तिला अनेक अनुभव आले आहेत, त्यापैकी काही कास्टिंग काउचचे (Casting Couch) अनुभव देखील आहेत. एका मुलाखतीत अंकिताने तिच्या करिअरमधील अशा अनुभवांबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. ती म्हणाली की, ती फिल्म इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात करत होती. ती एका साऊथ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली होती. तेथे तिला तडजोड करण्यास सांगण्यात आले होते.
अंकिता म्हणाली, त्यावेळी माझं वय 19 – 20 असेल. मी खूप स्मार्ट होते, हुशार होते, तेव्हा मी त्या खोलीत एकटी होते. तेव्हा एक व्यक्ती खोलीत आली आणि तुला तडजोड करावी लागेल असं त्या व्यक्तीने मला सांगितलं. मी त्याला विचारले, तुझ्या निर्मात्याला कसली तडजोड हवी आहे ? मला पार्टी आणि डिनरला जावे लागेल का ? अंकिताने सांगितले की, निर्मात्यासोबत झोपण्याबाबत बोलू नये म्हणून तिने असे प्रश्न विचारले आणि जेव्हा त्या व्यक्तीने हा विषय काढला तेव्हा मी त्चाचा बँड वाजवला.
मी त्या व्यक्तीला म्हणाले, मला वाटतं तुमच्या निर्मात्याला हुशार मुलींसोबत काम करण्यापेक्षा मुलींसोबत झोपण्यात जास्त रस आहे. असे बोलून मी तिथून लगेच निघाले. त्यानंतर त्याने माझी माफी मागितली आणि नंतर मला चित्रपटात कास्ट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मी त्याला म्हणाले, तू प्रयत्न केलास तरी मला तुझ्या चित्रपटात रस नाही.
यासदंर्भात आणखी एक अनुभव शेअर करताना अंकिता म्हणाली, जेव्हा मी चित्रपटांमध्ये प्रवेश केला तेव्हा मला ते पुन्हा जाणवले. एक खूप मोठा अभिनेता ज्याचे नाव मी घेणार नाही, त्याच्याशी हस्तांदोलन करून त्याचा चुकीचा हेतू मला समजला. मला अशा भावना जाणवल्या आणि मी लगेच माझा हात मागे घेतला. मला माहीत होतं की इथे माझं काहीही (काम) होणार नाही, कारण इथे फक्त देण्या-घेण्याचा व्यवहार चालतो. मी तेथून सरळ निघून गेले.