Bipasha Basu : त्या रात्री जे घडलं… ; बिपाशाने सांगितलं जॉनसोबतच्या ब्रेकअपचं कारण

आपल्या अनोख्या अदांनी एकेकाळी बॉलिवूडचा पडदा गाजवणारी बिपाशा बासू हिचे आजही लाखो चाहते आहेत. सध्या ती मॅरिड लाईफ एन्जॉय करत असून पती आणि लेकीसह बराच वेळ घालवताना दिसते. मात्र यापूर्वी तिच्या आयुष्यातही बरेच चढ-उतार आले होते. जॉन अब्राहमशी असलेलं तिचं नातं खूप चर्चेत होते, अनेक वर्ष एकमेकांन डेट केल्यावर त्यांनी अचानक ब्रेकअप केलं.

Bipasha Basu : त्या रात्री जे घडलं... ; बिपाशाने सांगितलं जॉनसोबतच्या ब्रेकअपचं कारण
बिपाशा बासू-जॉन अब्राहमचं ब्रेकअप का झालं ?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 9:44 AM

बिडी जलैले, बिल्लो रानी आणि अशा एकाहून एक सरस गाण्यांमध्ये अभिनेत्री बिपाशा बासूने जे ठुमके लगावले ते आजही अनेकांच्या लक्षात आहे. बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री असलेली बिपाशा आज अभिनयात फारशी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. लाखो चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या बिपाशाचा आज वाढदिवस आहे. तिचं पर्सनल आयुष्यही नेहमीच चर्चेत होतं. आज बिपाशा मॅरिड लाईफ एन्जॉय करत असून पती आणि लेकीसह बराच वेळ घालवताना दिसते. मात्र लग्नापूर्वी तिचं नाव बऱ्याच जणांसोबत जोडलं गेलं होतं. त्यातही अभिनता जॉन अब्राहम आणि बिपाशा यांच्या नात्याची तसेच त्यांच्या ब्रेकअपचीही बरीच चर्चा झाली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर लवकरच ते लग्न करणार असं सर्वांना वाटत होतं, पण एक दिवस अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमीच समोर आली आणि अनेकांना धक्का बसला.

डिनो मोरिया, मिलिंद सोमण, राणा डग्गुबती, हरमन बावेजा आणि जॉन अब्राहम यांसारख्या अनेक अभिनेत्यांसोबत बिपाशा बसूचे नाव जोडले गेले होते परंतु तिने केवळ जॉनसोबतच नाते स्वीकारले. एका मुलाखतीत ब्रेकअपनंतरची घटना बिपाशाने सांगितली होती.

जॉनबद्दल काय म्हणाली बिपाशा ?

तेव्हा एका वृत्तपत्राल दिलेल्या मुलाखतीत बिपाशा जॉनबद्दल प्रथमच बोलली. जॉनशी ब्रेकअपप का झालं, त्याचं खरं कारण काय असा प्रश्नही तिला विचारण्यात आला होता. त्यावेळी बिपाशा म्हणाली की, तिला त्यावेळी लग्न करायचे होते कारण ते दोघे आधीपासून 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते पण जॉन हा करियर बनवण्यात बिझी होता, त्याचं संपूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित होतं. त्यामुळे ते लग्नाबद्दल बोलले नाहीत.बिपाशा आणि जॉन लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं, हे सर्वांनाच माहीत होतं.

का केलं ब्रेकअप ?

तिच्यासमोर एक ट्विट आलं आणि जॉन आपली फसवणूक करत असल्याचे बिपाशाला समजलं. त्या ट्विटमध्ये जॉनने त्याच्या नावासोबत त्याची NRI गर्लफ्रेंड प्रिया हिचे नाव दिले होते. एके रात्री मी जेव्हा ते ट्विट पाहिल, मला प्रचंड धक्का बसला. एका रात्रीत सगळं जगच बदललं. त्यानंतर बिपाशाचं जॉनशी कडाक्याचं भांडण झालं, वादही झाले आणि एका वाईट वळणावर येऊन दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. 2011 साली त्यांच ब्रेकअप झालं.

बिपाशा-जॉनचे चित्रपट

2002 मध्ये जिस्म या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते, त्याच्या सेटवर जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांची भेट झाली. यानंतर ते मित्र बनले, प्रेमात पडले आणि नंतर एकत्र राहू लागले. ‘जिस्म’ (2003) व्यतिरिक्त बिपाशा आणि जॉन ‘ऐतबार’, ‘मधोशी’ आणि ‘विरुद्ध’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. ते दोघेही 2002 ते 2011 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर मात्र वेगळे झाले. ब्रेकअपमुळे मी आतून तुटले होते, पण मला माझं करिअर संपवायचं नव्हतं, म्हणून मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि मूव्ह ऑन केलं, असं बिपाशाने नमूद केलं होतं.

सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.