Dia Mirza | हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते, दिया मिर्झाची कबुली

15 फेब्रुवारीला उद्योगपती वैभव रेखी याच्यासोबत दिया मिर्झाचा विवाह झाला. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. (Dia Mirza replies on pregnancy)

Dia Mirza | हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते, दिया मिर्झाची कबुली
दिया मिर्झाने गेल्या आठवड्यात प्रेग्नन्सीची घोषणा केली
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 2:57 PM

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) वयाच्या 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढली. 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर दियाने वैभव रेखीसोबत (Vaibhav Rekhi) लगीनगाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दियाने बेबी बम्पसह फोटो शेअर करत थेट मालदीव्सहून गुड न्यूज दिली. त्यामुळे दिया लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दियाच्या फोटोवर एका इन्स्टाग्राम युझरने थेट लग्नाआधीच प्रेग्नन्सी जाहीर का नाही केलीस? असा सवाल विचारला. त्यावर उत्तर देताना दियाने लग्नाआधी गरोदर असल्याचं अप्रत्यक्षपणे कबूल केलं आहे. (Actress Dia Mirza replies to troll on Instagram who questioned timing of pregnancy announcement)

इन्स्टाग्राम कमेंटमध्ये दियाला सवाल

“चांगली गोष्ट आहे. अभिनंदन, पण प्रॉब्लेम हा आहे की तिने महिला पुरोहिताच्या साक्षीने लग्न करुन पूर्वग्र मोडण्याचा प्रयत्न केला. मग तिने लग्नाआधीच गरोदर असल्याचं जाहीर का नाही केलं? लग्नानंतरच गर्भधारणा ही परंपरा आपण पाळतोय असं नाही का वाटत? लग्नाआधी महिला गरोदर का राहू शकत नाहीत?” असा लाखमोलाचा सवाल पूजा चांडक नावाच्या महिलेने विचारला.

दिया मिर्झाचं उत्तर काय?

“इंटरेस्टिंग प्रश्न. पहिलं म्हणजे आम्हाला मूल होणार आहे, म्हणून आम्ही लग्न केलं नाही. आम्हाला आयुष्य एकत्र घालवायचं असल्यामुळे आम्ही लग्न करणार होतो. लग्नाची तयारी करत असताना आपल्याला बाळ होणार असल्याचं आम्हाला समजलं. म्हणजे, हे लग्न गर्भधारणेमुळे झालेलं नाही. वैद्यकीय कारणांमुळे सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत आम्ही प्रेग्नन्सीची बातमी फोडली नाही. ही माझ्या आयुष्यातील अत्यानंदाची गोष्ट आहे. मी अनेक वर्ष या गोष्टीची वाट पाहत होते. त्यामुळे वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त कुठल्याही कारणासाठी ते लपवण्याचा प्रश्नच येत नाही.” असं दियाने कमेंटला उत्तर देताना स्पष्ट केलं.

दियाने सांगितली पाच कारणं 

“तुमच्या प्रश्नाची उत्तरं देते, कारण 1. मूल होणं हे आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट आहे 2. या सुंदर प्रवासाशी कधीच लज्जेचा संबंध येता कामा नये 3. महिला म्हणून आपण कायम आपल्या आवडी-निवडी लक्षात घ्याव्यात 4. सिंगल राहून मूलाचं पालनपोषण करावं किंवा लग्नानंतर, हा सर्वस्वी आपला निर्णय आहे 5. काय योग्य आणि काय अयोग्य याचे पूर्वग्रह समाज म्हणून दूर करावेत” असंही दियाने सांगितलं.

चार वर्षांनी लहान वैभवशी दुसरा विवाह

15 फेब्रुवारीला उद्योगपती वैभव रेखी याच्यासोबत दिया मिर्झाचा विवाह झाला. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. वैभव हा दियापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. सध्या ते वाद्र्यातील पाली हिल भागात राहतात. वैभव हा इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. दियाने आपल्या नात्याविषयी जाहीर कबुली लग्न होईपर्यंत दिली नव्हती. मात्र ते 2020 मध्ये भेटल्याचं बोललं जातं. लॉकडाऊनच्या काळात ते एकत्रच राहत होते.

महिला पौराहिताच्या उपस्थितीत लग्न

दिया-वैभवच्या लग्नात अनेक नव्या गोष्टी बघायला मिळाल्या. त्यांनी लग्नात जुन्या परंपरांना मागे सारुन अनेक नव्या गोष्टींचं अनुकरण केलं. मंगलाष्टकं किंवा इतर विधींसाठी चक्क महिला पौरोहितांना निमंत्रण होतं. विशेष म्हणजे दियाच्या लग्नात कन्यादानाचा विधी पार पडला नाही. याशिवाय इतर पारंपरिक चालिरितींना न पाळता दिया पतीसोबत सासरी गेली.

नवऱ्याची पहिली मुलगीही सोबत

दिया सध्या वैभवसोबत हनिमूनला आहे. वैभव आणि त्याची पहिली पत्नी सुनैना यांना समीरा नावाची एक मुलगी आहे. समीरा सध्या दिया आणि वैभवसमवेत मालदीव्समध्ये आहे.

संबंधित बातम्या :

दिया मिर्झा होणार आई, मालदिवहून बेबी बंपचे फोटो पोस्ट

ना कन्यादान, ना पारंपरिक रितीरिवाज, मंगलाष्टिका म्हणायला महिला भटजी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जगावेगळा विवाह सोहळा

Dia Mirza | 39 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाह, दीड महिन्यात बेबी बम्प, दिया मिर्झाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट

(Actress Dia Mirza replies to troll on Instagram who questioned timing of pregnancy announcement)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.