Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dia Mirza | लग्नानंतर दिया मिर्झाचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर शेअर केले ‘बिकिनी’ फोटो!

दिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केले आहे. दिया आणि वैभव यांचे लग्न एका खास पद्धतीने पार पडले आहे. दिया आणि वैभवचे काही खास मित्र आणि कुटुंबीय या लग्नात सामील होते. अशा परिस्थितीत आता लग्नाच्या काही दिवसांनंतरच चाहत्यांना दियाची एक बोल्ड स्टाईल पाहायला मिळाली आहे.

Dia Mirza | लग्नानंतर दिया मिर्झाचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर शेअर केले ‘बिकिनी’ फोटो!
दिया मिर्झा
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 11:34 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Actress Dia Mirza) अजूनही तिच्या ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटासाठी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात दियाने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते. यानंतर दियाने बर्‍याच चित्रपटात काम केले. अलीकडेच दिया मिर्झाचे दुसरे लग्न पार पडले आहे.  त्यानंतर ती सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत आहे. नुकतेच दिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्रामवर खूप बोल्ड लूकमधले फोटो शेअर केले आहेत Actress Dia Mirza share sizzling Bikini photos on social media).

दिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केले आहे. दिया आणि वैभव यांचे लग्न एका खास पद्धतीने पार पडले आहे. दिया आणि वैभवचे काही खास मित्र आणि कुटुंबीय या लग्नात सामील होते. अशा परिस्थितीत आता लग्नाच्या काही दिवसांनंतरच चाहत्यांना दियाची एक बोल्ड स्टाईल पाहायला मिळाली आहे.

पाहा दियाचे बोल्ड फोटो

दिया अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टद्वारे चाहत्यांना आकर्षित करत असते. अशा परिस्थितीत अलीकडे अभिनेत्रीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, हे पाहून तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. दियाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका समुद्र किनाऱ्यावर फोटोसाठी पोझ देताना दिसली आहे. या फोटोंमध्ये दियाने फिरोजी रंगाची बिकिनी आणि लाँग श्रग परिधान केले आहे. या फोटोंमधील दियाचा लूक दिवसेंदिवस चर्चेत येत आहे.

दियाचे हे फोटो मालदीव ट्रीपचे आहेत. हे फोटो शेअर करताना दियाने लिहिले आहे की, ‘हिंद महासागर आणि @TravelWithJourneyLabel @jamanafaru_maldives मधील लोकांसोबत आपण येथे एका स्वर्गात आलो आहोत, मजा करत आहोत, येथे आतापर्यंतचा प्रत्येक क्षण खास आहे.’ सगळेच चाहते दियाच्या या अंदाजाने घायाळ झाले आहेत (Actress Dia Mirza share sizzling Bikini photos on social media).

दियाचा खास लूक

दिया मिर्झा लग्नानंतर हनीमूनवर गेली नाही. सध्या ती थेट कामात व्यस्त झाली होती. लग्नानंतर दियाचा ‘वेडिंग लूक’ही खूप व्हायरल झाला होता. चाहत्यांनी दियाला स्टायलिश मंगळसूत्र आणि डोक्यावर सिंदूर असलेल्या लूकमध्ये पाहिले होते. यावेळी दियाचे मंगळसूत्र खूप चर्चेत होते.

दियाने 15 फेब्रुवारी रोजी व्यावसायिका वैभव रेखाशी लग्न केले. या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. दियाच्या लग्नात पंडितही पुरुषाऐवजी एक स्त्री होती. ज्यामुळे त्यांचे लग्न बर्‍याच चर्चेत आले होते. दियाने चाहत्यांसाठी लग्नाचे काही खास फोटोही शेअर केले आहेत. दियाचा नवरा वैभवची माजी पत्नी सुनैना रेखी यांनीही नव विवाहित जोडप्यास लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

(Actress Dia Mirza share sizzling Bikini photos on social media)

हेही वाचा :

Birthday Special | पडद्यावरच्या सुप्रसिद्ध खलनायकाला सुरुवातीला मिळायचे केवळ 300 रुपये मानधन, वाचा प्रकाश राजबद्दल…

Kapil Sharma : ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी सज्ज, नव्या कलाकारांचीही एन्ट्री होणार!

ते राजकारण करताय; कोरटकर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
ते राजकारण करताय; कोरटकर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.
बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली
बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली.
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'.
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले.
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने.
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश.
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन.
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल.
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी.
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट.