Disha Parmar | दिशाने फ्लाँट केले बेबी बंप, ‘तो’ फोटो पाहून चाहते मात्र झाले नाराज ! …

टीव्ही अभिनेत्री दिशा परमार ही गरोदर असून ती सध्या रिलॅक्स करत आहे. नुकताच तिने बेबी बंप फ्लाँट करत एक फोटो शेअर केला आहे.

Disha Parmar | दिशाने फ्लाँट केले बेबी बंप, 'तो' फोटो पाहून चाहते मात्र झाले नाराज !  ...
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 1:38 PM

Disha Parmar Flaunts Baby Bump : ‘बडे अच्छ लगते है’ फेम अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) सध्या खूप खुश आहे. ती आणि पती, गायक राहूल वैद्य हे दोघेही लवकरच आई-बाबा बनणार असून काही दिवसांपूर्वी त्यांनी ही गुड न्यूज (good news) चाहत्यांसोबत शेअर केली होती. प्रेग्नंट दिशा ही फेज सध्या खूप एन्जॉय करत आहे. मात्र गरोदरपणातही तिचं काम सुरूच आहे.

असं असलं तरी नुकताच तिने स्वत:साठीही थोडा वेळ काढला आणि ती रिलॅक्स झाली. सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असलेल्या दिशाने नुकताच एक फोटो शेअर केला असून तो बराच चर्चेत आहे. स्वीमिंग पूलजवळ रिलॅक्स बसलेल्या दिशाने मोनोकिनी घालून बेबी बंपही फ्लॉंट केले आहे. मरून कलरच्या या ड्रेसमधील दिशाचा लूक सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.

चाहत्यांनी केले ट्रोल

बऱ्याच जणांना दिशाचा हा नवा अवतार आवडला. अनेकांनी तिचा फोटो लाईक करत कमेंट्स केल्या आहेत. मात्र काही फॅन्सना तिचा हा लूक बिलकूल आवडला नाही. मोनोकिनी घातल्याबद्दल अनेकांनी दिशाला ट्रोलही केले आहे. यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत काहींनी स्पष्टपणे हा लूक आवडला नसल्याचे नमूद केले आहे.

आमची संस्कारी प्रिया असं करू शकत नाही. मिस्टर कपूर हिला थांबवा ! अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर आम्हाला सिंपल आणि साधी-भोळी पंखुडीच (एका मालिकेतील दिशाचे नाव) आवडते. तू माझी फेव्हरिट आहे, पण आजा नाही, अशा शब्दांत दुसऱ्या युझरने नाराजी व्यक्त केली. तर (फोटो पाहून), मला थोडं वाईट वाटलं, अशा भावना आणखी एका युजरने व्यक्त केल्या.

या शो मुळे दिशाला मिळाली ओळख

‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेतील पंखुडीच्या भूमिकेमुळे दिशा लोकप्रिय झाली होती. या शोमध्ये ती नकुल मेहतासोबत झळकली होती. त्यांची हीच केमिस्ट्री आवडल्याने एकता कपूरने त्या दोघांनाही बड़े अच्छे लगते हैं च्या दुसऱ्या सीझनमध्ये कास्ट केलं. तेथेही त्यांची जोडी लोकांना खूप आवडली होती. सध्या हे दोघेही बड़े अच्छे लगते हैं च्या तिसऱ्या सीझनमध्येही दिसत आहेत. मात्र या शो ला पहिल्या सीझन इतका रिस्पॉन्स मिळताना दिसत नाहीये.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.