Gauahar Khan : रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गौहर खाननं ‘झल्ला-वल्ला’ वर धरला ठेका, डान्स व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री गौहर खाननं 25 डिसेंबरला बॉयफ्रेंड जैद दरबारशी लग्न केलंय. (Actress Gauhar Khan's dance on 'Jhalla-Valla' at reception party)

Gauahar Khan : रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गौहर खाननं 'झल्ला-वल्ला' वर धरला ठेका, डान्स व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 6:36 PM

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांमध्ये अप्रतिम आयटम साँग करणारी अभिनेत्री गौहर खाननं 25 डिसेंबरला बॉयफ्रेंड जैद दरबारशी लग्न केलंय. जैद दरबार हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. काल म्हणजेच 25 डिसेंबरला दोघांचं लग्न झालं आहे. तर रात्री पाहुण्यांसाठी एक रिसेप्शन पार्टीसुद्धा आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित चेहरे पोहोचले. या पार्टीमध्ये सगळ्यांनी धमाल केली आणि महत्वाचं म्हणजे गौहरनंसुद्धा या रिसेप्शन पार्टीत जबरदस्त डान्स केला.

या रिसेप्शनच्या निमित्तानं गौहरच्या सर्व मित्रांनी जोरदार डान्स केला. दरम्यान, पार्टीत जेव्हा ‘झल्ला-वल्ला’ गाणं लागलं तेव्हा अभिनेत्री गौहर स्वत: ला थांबवू शकली नाही. सुरुवातीला ती झैदबरोबर बसली होती आणि तिच्या मैत्रिणीच्या डान्सचा आनंद घेत होती. मात्र काही वेळात ती तिच्या खुर्चीमधून उठली आणि तिनं या गाण्यावर डान्स केला. रिसेप्शनमध्ये गौहर कमालीची सुंदर दिसत होती.

गौहर खानच्या रिसेप्शन पार्टीमध्ये संजय लीला भन्साळी, मनीष मल्होत्रा ​​आणि हुसेन कुवाझरवाला यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकार पोहोचले होते. यावेळी गौहरचे सासरे आणि झैदचे वडील इस्माईल दरबार देखील तेथे होते.

गौहर खानच्या मेंदीचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड लग्नापुर्वी गौहर खानचा मेंदी सोहळा पार पजला. गौहरनं मेहंदी फंक्शनमध्ये ग्रीन कलरचा शरारा परिधान केला होता. त्याच वेळी जैदनं ग्रीन कलरचा कुर्ता आणि जॅकेटसह पांढरा पायजामा घातला होता. या दोघंही अतिशय सुंदर दिसत होते. त्यांच्या या सोहळ्यांचे फोटो सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

View this post on Instagram

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

जैद माझ्यासारखाच आहे : गौहर खान ‘जैद अगदी माझ्यासारखाच आहे. आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि त्यानंतर काही दिवसांनीच एकमेकांसोबत वेळ घालवण्यास सुरुवात केली. लग्न करायचं असं काही ठरवलं नव्हतं. मात्र आमच्या पहिल्या भेटीच्या अवघ्या एक महिन्यातच जैदनं मला लग्नासाठी विचारलं’ , अशी प्रतिक्रिया गौहर खाननं दिली.

संगीतकार इस्माईल दरबार यांचं खास गाणं… गौहर आणि जैदच्या लग्न सोहळ्यात दोघांच्या कुटुंबियांनी धमाल केली. यावेळी जैद दरबारचे वडील, संगीतकार इस्माईल दरबार यांनी खास ‘तडप-तडप के इस दिल..’ हे गाणं गायलं. जैद आणि गौहरनं या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.