Mothers Day निमित्त सासूबाईंचाही फोटो, जेनेलिया देशमुखची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

"प्रिय आई, प्रिय मम्मा.. तुमच्याशिवाय मी काय केलं असतं, मला समजत नाही, असं जेनेलिया इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणते (Genelia Deshmukh Mother's Day)

Mothers Day निमित्त सासूबाईंचाही फोटो, जेनेलिया देशमुखची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
अभिनेत्री जेनेलिया देशमुखची सोशल मीडिया पोस्ट
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 12:12 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय मदर्स डेच्या (International Mother’s Day) निमित्ताने अभिनेत्री जेनेलिया देशमुखने (Genelia Deshmukh) अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जेनेलियाने आपली आई जेनेट डिसूझा (Jeanette D’Souza) आणि आपल्या सासूबाई वैशाली देशमुख (Vaishali Deshmukh) यांचे नातवंडांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही डोकं टेकू शकते, अशा शब्दात जेनेलियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Actress Genelia Deshmukh shares Emotional Instagram Post on International Mother’s Day)

जेनेलियाने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये जेनेलिया स्वतः, जेनेलिया आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांची मुलं रियान आणि राहिल तसंच जेनेलियाच्या मातोश्री आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये रियान-राहिल आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख दिसत आहेत.

काय आहे जेनेलियाची इन्स्टाग्राम पोस्ट?

“मातांमध्ये आपल्या मुलांसाठी नि:स्वार्थपणे आणि स्वतःला झोकून देऊन जगण्याची आश्चर्यकारक क्षमता असते. मुलांना ते स्वत: पालक होईपर्यंत त्याची जाणीवही नसते. हे 24 गुणिले 7 चालणारं असं काम आहे, ज्यात कुठलीही विश्रांती नाही, सुट्टी नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात कमी कृतज्ञता किंवा गृहित धरण्याची वृत्ती” याकडे जेनेलियाने लक्ष वेधलं.

“प्रिय आई, प्रिय मम्मा.. तुमच्याशिवाय मी काय केलं असतं, मला समजत नाही. आणि मला ते जाणूनही घ्यायचं नाही. मी तुमच्याशिवाय कामच करु शकत नाही. तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही डोकं टेकू शकते. मला माहित आहे, मी तुम्हाला हे फार वेळा सांगितलं नसेन, पण मला तुम्हाला इतकंच सांगायचंय, की आय लव्ह यू आणि तुमच्यासाठी मी देवाचे रोज आभार मानते”

अभिनेत्री जेनेलिया देशमुखच्या इन्स्टाग्राम पोस्टवर तिच्या जाऊबाई दीपशीखा देशमुख यांनीही सो क्यूट अशी कमेंट केली आहे. त्याला जेनेलियाने लाईक करत आभार मानले आहेत. जेनेलिया दरवर्षी मदर्स डे निमित्त वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपल्या आई आणि सासूबाईंचे ऋण व्यक्त करत असते.

:

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

संबंधित बातम्या :

Riteish-Genelia | ‘कपल गोल्स’, दुखापतग्रस्त पत्नीची सेवा करतोय रितेश देशमुख, पाहा त्यांचा क्युट Video

Riteish-Genelia | दुसऱ्या अभिनेत्रीच्या हातांचं चुंबन, चिडलेल्या जेनेलियाने केली रितेशची धुलाई, पाहा Video

(Actress Genelia Deshmukh shares Emotional Instagram Post on International Mother’s Day)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.