Kangana Ranaut | कंगना पाच दिवसानंतर मनालीला रवाना, पाच दिवसात काय-काय घडलं?
खूप जड अंतकरणाने मी मुंबई सोडत आहे, असं ट्वीट कंगनाने केलं आहे.
मुंबई : मुंबईतील नाट्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत मनालीला रवाना झाली आहे (Kangana Ranaut Leave Mumbai). खूप जड अंतकरणाने मी मुंबई सोडत आहे, असं ट्वीट कंगनाने केलं आहे. गेल्या 9 सप्टेंबरला कंगना मुंबईत दाखल झाली होती. त्यानंतर 5 दिवसांनंतर कंगना पुन्हा हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे तिच्या घरी जात आहे (Kangana Ranaut Leave Mumbai).
“खूप जड अंतकरणाने मी मुंबई सोडत आहे. या दिवसात माझ्यावर दहशत बसवण्याचा प्रयत्न केला गेला. माझं ऑफिस तोडल्यानंतर माझं घर तोडण्याचा प्रयत्न होत आहे, शस्त्रासह सुरक्षा माझ्याभोवती होती, मी पीओके असं म्हणणं हे बॅन्ग आँन ठरलं”, असं ट्वीट कंगनाने केलं.
With a heavy heart leaving Mumbai, the way I was terrorised all these days constant attacks and abuses hurled at me attempts to break my house after my work place, alert security with lethal weapons around me, must say my analogy about POK was bang on. https://t.co/VXYUNM1UDF
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020
जेव्हा रक्षक भक्षक होण्याची घोषणा करतात. हे लोकशाहीचं चिरहरण करत आहेत. मला कमकुवत समजून, मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवून, तिचा अपमान करुन तुम्ही स्वत:चीच इमेज खराब करत आहात, असंही ट्वीट तिने केलं.
जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धड़ियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमज़ोर समझ कर बहुत बड़ी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!!
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020
Kangana Ranaut Leave Mumbai
कंगनाचे मुंबईत पाच दिवस कसे गेले?
9 सप्टेंबर –
- कंगना मनालीहून मुंबईत आली
- कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयातील अनधिकृत बांधकाम महापालिकेने तोडले
- कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख
- अनेक ठिकाणी कंगनाविरोधात आंदोलनं
10 सप्टेंबर –
- बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’, कंगनाची मुख्यमंत्र्यांवर कडवट टीका
- बीएमसीने तोडलेल्या पाली हिलमधील कार्यालयात जाऊन कंगनाकडून पाहणी
- कंगना रनौत आणि रामदास आठवले यांची भेट
- रामदास आठवलेंचा कंगनाला पाठिंबा
- कंगना राणावत विरोधात शिवसेना आक्रमक
11 सप्टेंबर –
- कंगना रनौतवर ड्रग्ज घेतल्याचा अभिनेता शेखर सुमनचा आरोप, गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
12 सप्टेंबर –
- कंगनाविरोधात अकोला, औरंगाबादसह अनेक ठिकाणी पोलिसांत तक्रारी
13 सप्टेंबर –
- करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेदी कंगना रनौतच्या भेटीसाठी तिच्या घरी गेले
- कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवन येथे गेली, कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भेट
- कंगनाच्या खारमधील घरालाही बेकायदेशी बांधकामाप्रकरणी बीएमसीची नोटीस
- कार्यालयानंतर आता घरावरही कारवाई होण्याची शक्यता
Kangana Ranaut Leave Mumbai
संबंधित बातम्या :
कार्यालयानंतर बीएमसीच्या रडारवर कंगनाचं घर, ‘या’ 8 प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश