Kangana Ranaut Video : सलमान-कंगना करणार एकत्र काम ? अभिनेत्यासमोर कंगनाच्या सुपर्ब डान्सनंतर चाहत्यांची मागणी !

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने नुकताच एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सलमान समोर माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Kangana Ranaut Video : सलमान-कंगना करणार एकत्र काम ? अभिनेत्यासमोर कंगनाच्या सुपर्ब डान्सनंतर चाहत्यांची मागणी !
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 10:40 AM

Kangana Ranaut Video : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण ती अतिशय रोखठोकही बोलते. ती कधी, कोणाबद्दल, काय वक्तव्य करेल याची कोणालाच कल्पना नसते. सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असलेली कंगना तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्सही देत असते. कंगनाने नुकतीच एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अभिनेता सलमान खानसोबतचा (Salman Khan) व्हिडीओ शेअर करत कंगना नॉस्टॅल्जिक झाली होती.

कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती सलमान खानच्या दस का दम गेली होती. हा खूपच फनी व्हिडिओ असून त्यामध्ये तिने घाघरा आणि डोक्यावर ओढणी घेऊन डान्सही केला. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या सुप्रसिद्ध ‘धक धक करने लगा’ या लोकप्रिय गाण्यावरही कंगनाने डान्स केला. तिच्या या स्पिरीटसाठी सलमानने तिचे कौतुकही केले आहे.

एवढेच नव्हे तर सलमानही तिच्यासोबत काही डान्स स्टेप्सही केल्या. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून दोघेही हा डान्स खूप एन्जॉय करताना दिसतात. कंगनाचा हा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षकही तिला चिअर करत टाळ्या वाजवल्या. आता कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही हा व्हिडीओ शेअर करत सलमानला टॅग करत लिहिले, ‘OMG!!! SK आपण इतके तरुण का दिसतो ?? याचा अर्थ आपण आता नाही आहोत का?’ यानंतर तिने हसणारे काही इमोजीही शेयर केले आहेत.

कंगनाचे आगामी प्रोजेक्ट्स

कंगना राणौत अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी बॉलिवूडमध्ये महिला आणि कलाकारांसोबत होणाऱ्या भेदभावावर उघडपणे बोलली. त्यामध्ये तिने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांवर निशाणा साधला. कंगनाचा शेवटचा प्रदर्शित झालेला ‘धाकड’ हा चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकला नाही. आता कंगना टिकू वेड्स शेरू, तेजस, इमर्जन्सी आणि चंद्रमुखी 2 मध्ये दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by kanganadaily (@kanganadaily)

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.