हे तर करदात्यांचे पैसे, कंगनाने नाकारली घर पाडल्याची नुकसान भरपाई

Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. 2020 मध्ये बीएमसीने पाडलेल्या तिच्या घरासंदर्भात अभिनेत्रीने पुन्हा एकदा विधान केले आहे.

हे तर करदात्यांचे पैसे, कंगनाने नाकारली घर पाडल्याची नुकसान भरपाई
कंगनाने नाकारली नुकसानभरपाई
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 2:21 PM

मुंबई : बॉलीवूडची बोल्ड आणि बेधडक अभिनेत्री कंगना रनौ(kangana ranaut) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडली आहे. 2020 मध्ये कंगनाच्या मुंबईतील घराचा काही भाग बीएमसीने पाडला (demolition) होता. ज्यामुळे कंगना खूप संतापली होती आणि तिने उघडपणे अनेक वक्तव्येही केली होती. त्याच वर्षी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांना वाय प्लस सुरक्षाही देण्यात आली होती. सोशल मीडियावर कंगनाचे चाहते तिला अनेकदा नुकसानभरपाईबाबत प्रश्न विचारतात.

सप्टेंबर 2020 मध्ये, तिला नोटीस बजावल्यानंतर एका दिवसात, कंगनाच्या घर-कार्यालयाचा काही भाग बेकायदेशीर बांधकामामुळे पाडण्यात आला. त्यावेळी कंगना आणि शिवसेना यांच्यातही शाब्दिक युद्ध सुरू होते. अशा परिस्थितीत कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान घराचा एक भाग पाडल्याच्या भरपाईबाबत प्रश्न केला. त्यावर कंगनाने जे उत्तर दिले, ते ऐकून तिच्या चाहत्यांना खूप आनंद होईल.

कंगनाच्या म्हणण्यानुसार, तिला कोणतीही भरपाई मिळालेली नाही, ते तिला एक मूल्यांकनकर्ता (evaluator) पाठवणार होते. त्यामुळे तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. कंगना पुढे म्हणाली की तुम्हीच मला मुल्यांकन करून पाठवा. करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग करणारे इतर कोणी मला नकोत. मला आणखी भरपाई नकोय, जे आहे ते ठीक आहे असेही कंगनाने नमूद केले

ती पुढे म्हणाली, “न्यायालयाने सांगितले आहे की त्यांनी मला कितीही नुकसान भरपाई द्यावी, परंतु मी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधीही मूल्यांकनकर्त्यांना पाठवले नाही आणि मी मागणी केली नाही कारण मला करदात्यांच्या पैशाची माहिती आहे आणि मला त्याची गरज नाही.”

कामाबद्दल सांगायचे झाले तर कंगना इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून कंगना दिग्दर्शनातही पाऊल टाकणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.